Home /News /videsh /

व्यवसाय बंद ठेवणाऱ्या कंपन्यांना रशियाचा इशारा, कंपन्या सुरू न केल्यास घेणार 'हा' निर्णय

व्यवसाय बंद ठेवणाऱ्या कंपन्यांना रशियाचा इशारा, कंपन्या सुरू न केल्यास घेणार 'हा' निर्णय

रशियाच्या कनिष्ठ असेंब्ली ड्यूमाचे सदस्य येवगेनी फेडोरोव्ह यांनी 1 मे पर्यंत रशियामध्ये व्यवसाय पुन्हा सुरू न करणाऱ्या विदेशी कंपन्यांवर 10 वर्षांची बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे.

    मॉस्को, 18 मार्च : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. या दोन देशात युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातील अनेक कंपन्यांनी आपलं काम थांबवलं होतं. याविरोधात आता रशिया कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत दिसत आहे. रशियाच्या कनिष्ठ असेंब्ली ड्यूमाचे सदस्य येवगेनी फेडोरोव्ह यांनी 1 मे पर्यंत रशियामध्ये व्यवसाय पुन्हा सुरू न करणाऱ्या विदेशी कंपन्यांवर 10 वर्षांची बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाच्या टीव्ही चॅनल आरटीनुसार, फेडोरोव्ह यांनी यासंदर्भात आर्थिक विकास मंत्रालयाचे प्रमुख मॅक्सिम रेशेतनिकोव्ह यांना पत्र लिहिले आहे. फेडेरोव्ह यांनी म्हटले आहे की, लोकांना रोजगार देणाऱ्या आणि येथे गुंतवणूक करणाऱ्या अनेक परदेशी कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय बंद केला आहे, त्यांच्या मते, या कंपन्यांनी हजारो रशियन नागरिकांना त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चिततेच्या स्थितीत टाकले आहे. रशियाला झटका! युरोपियन स्पेस एजन्सीने 8433 कोटी रुपयांच्या मिशनमधून काढलं बाहेर फेडेरोव्हने पत्रात लिहिले आहे की मी तुम्हाला या कंपन्यांच्या परतण्याच्या अटी निश्चित करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यास आग्रह करतो. या कंपन्यांना 1 मे 2022 पर्यंत त्यांचे व्यावसायिक कामकाज ताबडतोब पुन्हा सुरू करण्यास सांगितले पाहिजे, असे न केल्यास त्यांच्या व्यावसायिक कामकाजावर 10 वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात यावी. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशिया सोडणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी बाह्य व्यवस्थापन सुरू करण्याच्या सरकारच्या कल्पनेला पाठिंबा दिला होता. त्यांच्या मते, अधिकाऱ्यांकडे यासाठी पुरेसे कायदेशीर मार्ग आहेत. परदेशी कंपन्यांच्या व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याऐवजी त्यांच्यासाठी तात्पुरता प्रशासन नेमणे योग्य ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या