हे आहे जगातलं सर्वात थंड गाव; -71 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं तापमान

हे आहे जगातलं सर्वात थंड गाव; -71 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं तापमान

थंडीच्या दिवसांत येथे लहान मुलं सरासरी -50 डिग्री तापमानपर्यंतच शाळेत जातात. यापेक्षा तापमान खाली गेल्यास, शाळा बंद केल्या जातात. लहान मुलांना येथील तापमानानुसार तयार केलं जातं.

  • Share this:

मॉस्को, 20 डिसेंबर : यावर्षात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात भारतासह जगभरातील अनेक शहारांत तापमान उणे अंशाखाली जातं. पण जगात एक गाव आहे, ज्याचं कमीत-कमी तापमान -71 डिग्री सेल्सियसवर पोहचतं?

रशियातील (Russia) सायबेरिया (Siberia) गावातील ओम्याकोन (Oymyakon) येथील थंडीत लोकांची स्थिती अतिशय खराब होते. या गावात थंडीमुळे अशी परिस्थिती होते की, कोणतंचं पीक येथे पिकत नाही. लोक मुख्यत: मांस खाऊनच आपलं जीवन जगतात.

थंडीच्या दिवसांत येथे लहान मुलं सरासरी -50 डिग्री तापमानपर्यंतच शाळेत जातात. यापेक्षा तापमान खाली गेल्यास, शाळा बंद केल्या जातात. लहान मुलांना येथील तापमानानुसार तयार केलं जातं. त्यामुळे 11 वर्षांपर्यंत मुलांना थंडीपासून वाचण्यासाठी -56 डिग्री सेल्सियसहून तापमान खाली गेल्यास, घरी राहण्याची परवानगी आहे. थंडीत दिवसाच तापमान -45 ते -50 डिग्री सेल्सियसपर्यंत असतं. त्यामुळे सर्व मुलांना शाळेत जावं लागतं. येथे डिसेंबर महिन्यात सूर्य 10 वाजण्याच्या जवळपास उगवलेला दिसतो.

(फोटो: पिनट्रेस्ट)

(फोटो: पिनट्रेस्ट)

अंटार्कटिकाबाहेर याला जगातील सर्वात थंड ठिकाण मानलं जातं. 1924 मध्ये या जागेचं तापमान -72.2 डिग्री सेल्सियस रेकॉर्ड करण्यात आलं होतं. 2018 च्या आकड्यांनुसार, या गावात 500 ते 900 लोक राहतात.

या कडाक्याच्या थंडीत येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गाड्यांची बॅटरी गोठली जाऊ नये, त्यासाठी गाड्या दररोज स्टार्ट ठेवाव्या लागतात. येथील लोकं वेगवेगळ्या प्रकारचं मांस खातात. घोड्याच्या मांसाशिवाय स्ट्रोगनीना माशाचं सेवन केलं जातं. जून-जुलैमध्ये जगभरातील अनेक भागात भयंकर उन्हाळा असतो, त्यावेळी येथील तापमान 20 डिग्री सेल्सियसपर्यंत असतं.

Published by: Karishma Bhurke
First published: December 20, 2020, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading