मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia Firing शाळेत अंदाधुंद गोळीबारात 8 विद्यार्थ्यांसह 13 जणांचा मृत्यू, 2 हल्लेखोर ठार

Russia Firing शाळेत अंदाधुंद गोळीबारात 8 विद्यार्थ्यांसह 13 जणांचा मृत्यू, 2 हल्लेखोर ठार

Russia school firing वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार शाळेच्या आत एक स्फोटही झाला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन हल्लेखोरांना ठार केलं तसंच एका संशयिताला अटकही केली आहे.

मॉस्को, 11 मे: रशियाच्या (Russia) कझान (Kazan) शहरामध्ये मंगळवारी एका शाळेमध्ये (Firing in School) घुसून काही हल्लेखोरांनी हल्ला चढवला. शाळेत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये सुमारे 13 जणांचा (13 died in Russia School Firing) मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्यात 8 विद्यार्थ्यांचाही (School Students) समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच एका शिक्षकाचाही मृत्यू झाला आहे.

(वाचा-अनिल देशमुख आता ईडीच्या जाळ्यात, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया)

रशियातील इमर्जन्सी सर्व्हीसच्या एका प्रवक्त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शाळेत घुसलेल्या हल्लेखोरांना अचानक अंदाधुंद गोळीबार केला. त्या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दोन मुलांनी थेट तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. एवढ्या उंचावरून खाली पडल्यानं त्यांचाही मृत्यू झाला.

(वाचा-आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर)

रशियातील वृत्तसंस्था RIA ने दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या चौथ्या मजल्यावर एका हल्लेखोरानं काही जणांना बंदी बनवूनही ठेवलं आहे. या घटनेतील 12 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या आत एक स्फोटही झाला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन हल्लेखोरांना ठार केलं तसंच एका संशयिताला अटकही केली आहे. शाळेच्या इमारतीचे नुकसान झाल्याचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र हल्ल्यामागचे कारण किंवा इतर काही गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. कझान हा मुस्लीमबहुल प्रांत असून तातारस्तानची राजधानी म्हणून हे ओळखलं जातं.

First published:

Tags: Gun firing, Russia, School