FACT CHECK : पुतिन यांच्या मुलीने टोचून घेतली पहिली Covid लस, पण हा VIDEO खरा की खोटा?
पुतिन (Vladimir Putin) यांची मुलगी (Putin daughter) व्हॉलेंटिअर म्हणून लस (Covid vaccine) टोचून घेतानाचा एक VIDEO कालपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
मॉस्को, 12 ऑगस्ट : जगभरातील कोरोना लशीच्या स्पर्धेत रशियाने (russia) बाजी मारली आणि पहिल्यांदा लस (russian corona vaccine) बाजारात आणली. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. पुतिन (Vladimir Putin) यांची मुलगी (Putin daughter) व्हॉलेंटिअर म्हणून लस (Covid vaccine) टोचून घेतानाचा एक VIDEO कालपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पण हा व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Putin announces world’s 1st COVID-19 vaccine.
World’s first #Corona vaccine in russia given to Putin's daughter.
हा व्हिडिओ गेल्या महिन्यातला असून व्हिडीओत दिसणारी महिला ही पुतिन यांची मुलगी नाही. ती अन्य व्ह़ॉलेंटिअर आहे.
दरम्यान या लशीचं शेवटच्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. पण पुतिन यांनी मात्र लस सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.
रशियाचे प्रमुख व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःच आपल्या मुलीने लस घेतल्याचं सांगितलं होतं. लस घेतल्यानंतर तिची प्रकृती व्यवस्थित आहे. शरीराचं तापमान थोडंसं वाढलं पण त्यानंतर ते स्थिर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
जगातील सर्वात पहिली कोरोना लस तयार करणाऱ्या रशियाने आता आणखी एक खूशखबर दिली आहे. लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे. दोन आठवड्यांत रशियन कोरोना लशीची पहिली बॅच तयार होणार आहे. 20 पेक्षा अधिक देशांकडून रशियन लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रशियाने दिली आहे.