Home /News /videsh /

युक्रेनवरील हल्ला पुतिन यांना महागात! निर्बंधांच्या ओझ्यामुळे रशिया 'या' देशांच्या रांगेत पहिल्या स्थानावर

युक्रेनवरील हल्ला पुतिन यांना महागात! निर्बंधांच्या ओझ्यामुळे रशिया 'या' देशांच्या रांगेत पहिल्या स्थानावर

Russia Now No. 1 in Most-Sanctioned Countries: युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यानंतर रशिया जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश बनला आहे. Castellum.ai ने जारी केलेल्या या आकडेवारीनुसार, युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर 2778 नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. यासह निर्बंधांची एकूण संख्या 5532 झाली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 8 मार्च : जगभरातील कठोर निर्बंधांचा (Sanction against Russia) सामना करणाऱ्या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी ग्लोबल सॅन्क्शन्स ट्रॅकिंग (Global Sanctions Tracking) डेटाबेस जारी करण्यात आला. ज्यावरून हे समोर आले आहे की रशिया आता निर्बंधांच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर (Ukraine-Russia War) अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. त्यानंतर रशिया जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश बनला आहे. Castellum.ai ने जारी केलेल्या या आकडेवारीनुसार, युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर 2778 नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. यासह निर्बंधांची एकूण संख्या 5532 झाली आहे. रशियावर लादल्या जाणाऱ्या या निर्बंधांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नेटफ्लिक्स, अमेरिकन एक्सप्रेस, मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्डसह अनेक अमेरिकन कंपन्यांनी रशियामधील त्यांच्या सेवा निलंबित केल्या आहेत. दुसरीकडे व्लादिमीर पुतिन यांनी या निर्बंधांचे वर्णन युद्धाची घोषणा असे केले आहे. चला जाणून घेऊया कोणत्या देशांवर सर्वाधिक निर्बंध लादले आहेत. रशिया: Castellum.ai च्या डेटानुसार, 22 फेब्रुवारीपूर्वी रशियावर 2754 निर्बंध लागू होते. मात्र युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर 2778 निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे निर्बंधांची ही संख्या आता 5532 वर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांनो, शिक्षण घेण्यासोबतच करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; लगेच मिळेल Job इराण : जागतिक निर्बंधांच्या या यादीत इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पश्चिम आशियाई देशावर एकूण 3616 निर्बंध लादण्यात आले आहेत. हे सर्व निर्बंध गेल्या दशकभरात लादले गेले आहेत. ज्यावर इराणच्या विवादित आण्विक कार्यक्रम आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. सीरिया : या देशातील गृहयुद्धानंतर अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडने अनेक निर्बंध लादले आहेत. सीरियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांची एकूण संख्या 2608 असून यातील बहुतांश निर्बंध 2011 नंतर लादण्यात आले आहेत. CBSE Term1 Result: विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता उत्तर कोरिया: संयुक्त राष्ट्रांनी 2006 पासून उत्तर कोरियावर त्याच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमध्ये व्यक्ती आणि कंपन्यांचाही समावेश आहे. Castellum.ai ची यादी दर्शवते की उत्तर कोरियावर 2,077 निर्बंध आहेत. व्हेनेझुएला: या दक्षिण अमेरिकन देशावर 651 निर्बंध लादले गेले आहेत. अमेरिकेने 2017 पासून हे निर्बंध लादले आहेत. याशिवाय म्यानमारवर 510 आणि क्युबावर 208 निर्बंध लादण्यात आले आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या