Home /News /videsh /

अन् संसदेत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना मिळालं स्टॅडिंग ओवेशन; म्हणाले, ''कोणत्याही परिस्थितीत...''

अन् संसदेत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना मिळालं स्टॅडिंग ओवेशन; म्हणाले, ''कोणत्याही परिस्थितीत...''

Russia and Ukraine War: युक्रेन कोणत्याही किंमतीत हार मानणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

    कीव, 09 मार्च: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या युद्धावर वारंवार चर्चा होत आहेत, पण तोडगा काही निघचाना दिसत नाही आहे. आता या युद्धाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आपलं भाषण दिलं आहे. युक्रेन कोणत्याही किंमतीत हार मानणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. सभागृहात झेलेन्स्की यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व खासदारांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं (स्टॅडिंग ओवेशन )आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी त्यांचं अभिभाषण सुरू केलं. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आज मी ब्रिटनच्या सर्व सहकाऱ्यांशी बोलत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की या युद्धाला 13 दिवस झाले आहेत, असे युद्ध जे आपण सुरूही केलं नव्हतं. पण आता आम्ही आमच्या भूमीसाठी लढणार आहोत, आम्ही कोणत्याही परिस्थितीत लढणार आहोत. आपल्या भाषणादरम्यान झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचंही खुलेपणानं कौतुक केलं. त्यांच्या मते बोरिस यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. ब्रिटननं आता रशियावर आणखी कडक निर्बंध लादले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केलं. रशियाला दहशतवादी देश घोषित करावं, असेही ते म्हणाले. ब्रिटन अशा काही देशांपैकी एक आहे ज्यांनी सुरुवातीपासूनच युक्रेनला पाठिंबा दिला आहे. शस्त्रास्त्रांचा पुरवठाही करण्यात आला असून रशियावर विविध निर्बंधही लादण्यात आले आहेत. बोरिस जॉन्सन यांनीही त्यांच्या स्तरावर अनेक बैठका घेतल्या असून पुतीन यांना चर्चेत वेगळे ठेवण्यावर भर दिला गेला आहे. अमेरिकेनं रशियालाही एकाकी पाडलं आहे. सुरुवातीला ही कारवाई केवळ हवाई क्षेत्र बंद करणं आणि इतर काही निर्बंधांपुरती मर्यादित ठेवली जात होती. आता एक पाऊल पुढे जात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यांनी इतर देशांना रशियावरील निर्भरता कमी करण्याचा सल्लाही दिला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या