मॉस्को, 16 जुलै : प्रेम कधी, कसं आणि कोणासोबत होईल हे कोणालाच माहित नसतं. मात्र रशियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एका आईचाच आपल्या मुलावर जीव जडला. एवढंच नाही तर आता आई आणि मुलानं लग्नही केले आहे. याआधी दोघंही एका बाळाचे पालक होणार असल्याचे व्हिडीओ त्यांनी पोस्ट केले होते. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
35 वर्षीय मरिना सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असून तिने व्लादिमीर या आपल्या 20 वर्षीय सावत्र मुलाशी विवाह केला आहे. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या स्वावयंक-ऑन-कुबान येथे राहणारा व्लादिमीर हा मरिनाचा सावत्र मुलगा आहे. याआधी मरिनाने व्लादिमीरचे वडील अलेक्सी शेव्हरिन यांच्याशी विवाह केला होता. मात्र अलेक्सी आणि मरिना यांचा काही महिन्यातच घटस्फोट झाला. त्यानंतर व्लादिमीर आणि मरिना यांच्यातील जवळीक वाढली. व्लादिमीर याचा एक भाऊही आहे त्याचे नाव विक्टर आहे.
वाचा-मृतदेहाचा फोटो काढायला गेला फोटोग्राफर, अचानक मृताच्या तोंडातून आला आवाज आणि...
अलेक्सीनं आपल्या मुलाला पत्नीसोबत पाहिलं आणि...
अलेक्सीनं लग्नानंतर मरीना यांना एकही मुलं झालं नाही, मात्र त्यांनी पाच मुलांना दत्तक घेतलं होतं. याचवेळी त्यांनी व्लादिमीर आणि मरीना यांच्यातील जवळीत वाढल्याचं पाहिले. मात्र एकेदिवशी या दोघांना अलेक्सीनं बेडरूममध्ये अश्लील चाळे करताना पाहिलं आणि त्यानंतर मरीनाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
वाचा-3 बहिणी एकत्र झाल्या आई आणि मावशी; एकाच रुग्णालयात एकाच दिवशी झाली डिलीव्हरी
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.