चिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर !

चिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर !

सिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली जातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, न्यूज 18, 5 जुलै: सिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली जातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय. हायवांग शियांग असं चिनी युद्धनौकेचं नाव असून ते सध्या भारतीय समुद्राच्या हद्दीच्या आसपास गस्त घालताना आढळून आलंय. चीनच्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं गेल्याचं बोललं जातंय.

सिक्कीमच्या डाकलम सीमाभागात चिनी सैनिकांकडून रस्तेबांधणीसाठी घुसखोरीचा प्रयत्न होतोय पण भारतीय सैन्यदलाने चीनचे मनसुबे उधळून लावलेत. त्यामुळेच चीनच्या सरकारी वृत्तपत्रांमधून भारताला युद्धखोरीची धमकी दिली जातेय. म्हणूनच भारतानेही चीनच्या हालचालींवर आत्तापासूनच करडी नजर ठेवायला सुरूवात केलीय.

'रुख्मिणी' उपग्रहाचं महत्व काय?

संपर्क आणि देखरेख, ही दोन्ही कामं चोख करण्याची क्षमता असलेला जीसॅट-७ हा उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी उपग्रहात सोडण्यात आला होता. २६२५ किलो वजनाच्या या उपग्रहाचं नाव रुक्मिणी असं आहे. हिंदी महासागराच्या विस्तीर्ण क्षेत्रात २००० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात हा अवकाशातील डोळा लक्ष ठेवून असल्यानं नौदलाचं काम सोपं झालंय. युद्धनौका, पाणबुड्या, सागरी हवाई पाहणी विमानांच्या हालचाली, याबाबतचे अपडेट्स रुक्मिणीमुळे नौदलाला मिळत आहेत. अरबी समुद्रापासून बंगालच्या खाडीपर्यंत कोण काय हालचाली करतंय, हेही हा उपग्रह टिपतोय. रुक्मिणी उपग्रह पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर अंतरावर आहे. २०१३ मध्ये ४ टन वजनाचा उपग्रह सोडणारा प्रक्षेपक भारताकडे नव्हता. त्यामुळे १८५ कोटी रुपये खर्च करून फ्रान्सच्या मदतीने जीसॅट-७ उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. त्याचा मोठा फायदा नौदलाला होत आहे.

First published: July 5, 2017, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading