निसर्गाचा अद्भुत चमत्कार; समुद्राच्या तळाशीही वाहतात नद्या

निसर्गाचा अद्भुत चमत्कार; समुद्राच्या तळाशीही वाहतात नद्या

समुद्राच्या तळाशी अगदी खोलवरही नद्या वाहतात (River under the sea). वाचून आश्चर्य वाटलं ना? काय आहेत याची कारणं जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 03, नोव्हेंबर: जमिनीवरच नाही तर समुद्राच्या तळाशीही नद्या वाहतात. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकीत करेल. परंतु जशा जमिनीवर नद्या वाहतात तशाच समुद्राच्या तळाशी सुद्धा वाहतात. फक्त यापूर्वी याबद्दल माहिती नव्हती परंतु, आता जगभरातील शास्त्रज्ञांनी बऱ्याच ठिकाणी अशा मोठ्या नद्या शोधल्या आहेत. ज्या खूप लांब आहेत आणि अतिशय वेगाने सतत वाहत असतात. अशाच एका नदीचा शोध प्रथम मेक्सिकोमध्ये समुद्राच्या खाली लागला. याला सिनेटो अँजेलिना म्हणतात. समुद्राच्या 115 फूट खाली कुठेतरी ही नदी वाहते. या नदीचं पाणीदेखील खारट आहे.

समुद्राखाली नद्या कशा वाहतात?

समुद्रात नदीचा उगम कुठून होतो? समुद्राच्या पाण्यात त्या आपलं अस्तित्व कसं टिकवून ठेवतात ? असे बरेच प्रश्न आहेत जे लोकांच्या मनात आहेत. नद्यांच्या निर्मितीची काही मुख्य कारणं आहेत. घनता, समुद्राच्या पाण्याची घनता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असल्यामुळे हे घडू शकतं. जेव्हा पाण्याची घनता एकत्र होते तेव्हा समुद्राच्या आत एक नवीन प्रवाह तयार होतो. बऱ्याच वेळा समुद्रामधील अनेक लहान नाले एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार करतात आणि ते एकत्र वाहू लागतात.

पाणी गरम आणि थंड असल्यामुळे सुद्धा प्रवाह तयार होतात

दुसरं कारण असं की सूर्य-किरण समुद्राच्या वेगवेगळ्या भागांवर पडत असतात त्यामुळे कधी कधी पाणी थंड तर कधी गरम होतं. त्यामुळे समुद्राच्या आत प्रवाह निर्माण होतात.

पृथ्वीची प्रदक्षिणा

तिसरं कारण म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा. पृथ्वी ज्या पद्धतीने स्वत: भोवती प्रदक्षिणा घालते तेही प्रवाह तयार होण्याचं एक कारण आहे असं मानलं जात आहे. उत्तर गोलार्धातील समुद्रातील प्रवाह सामान्यतः घड्याळाच्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात.

गल्फ प्रवाह समुद्रातील सर्वांत मोठी नदी 

गल्फ प्रवाह हा समुद्राच्या खालील सर्वात मोठा प्रवाह आहे. हा प्रवाह इतका मोठा आहे की जगातील सर्व नद्या एकत्र जोडल्या गेल्या तरीदेखील या प्रवाहाचा आकार त्यांच्यापेक्षा मोठा आहे. हा प्रवाहाच्या पाण्याचा रंग निळा आहे. समुद्राखाली वाहताना हा स्पष्टपणे दिसून येतो. याच्या रंगामुळे अवकाशातील सॅटेलाइट्सना हा स्पष्टपणे दिसतो.

वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रवाह

जगाच्या वेगवेगळ्या भागांत समुद्राखाली वेगवेगळ्या नद्या वाहतात उदाहरणार्थ ब्राझीलचा प्रवाह, जपानचा प्रवाह, उत्तर विषुववृत्त प्रवाह, उत्तर प्रशांत महासागरीय प्रवाह हे जगातील मुख्य प्रवाह. लॅब्राडॉरचा थंड प्रवाह आर्टिक समुद्रातून अटलांटिककडे वाहतो. बरेचदा या नद्या समुद्रामध्ये राहणाऱ्या प्राण्यांसाठी सी-फूड किंवा पोषक द्रव्यदेखील आपल्यासोबत वाहून आणतात.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 3, 2020, 7:44 AM IST
Tags: rivers

ताज्या बातम्या