Home /News /videsh /

पृथ्वीसाठी धोक्याची घंटा, शनी भोवतीची कडी वितळत आहे!

पृथ्वीसाठी धोक्याची घंटा, शनी भोवतीची कडी वितळत आहे!

नासाच्या कॅसिनि स्पेसक्राफ्टने (Cassini spacecraft) शनीच्या या कडीचा अभ्यास केला असून त्यासंदर्भात काही आकडेवारीही जाहीर केली आहे.

    न्यूयॉर्क 20 जून: शनी हा तसा कायम चर्चेतल ग्रह आहे. सगळेच त्याच्यापासून जरा दूरच राहणं पसंत करतात. एखाद्यामागे काही संकटं लागली की शनीची पीडा अशी आता म्हणच पडली आहे. मात्र वैज्ञानिकांना अभ्यासासाठी हा लाडका ग्रह आहे. अवकाशातल्या सुंदर ग्रहांपैकी शनी हा महत्त्वाचा ग्रह असून त्याच्याविषयी नवी माहिती आता बाहेर आली आहे. हा सूर्यकुलातील गुरूनंतरचा आकारमानाने दुसऱ्या क्रमाकांचा मोठा ग्रह आहे. सूर्यापासूनच्या अंतराच्या संदर्भात हा सहाव्या क्रमांकाचा ग्रह असून याची कक्षा पृथ्वीच्या वा मंगळाच्या कक्षेहून मोठी असल्याने याला ‘बहिर्ग्रह’ म्हणतात. शनीचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते त्याच्याभोवती असणाऱ्या चमकदार कडींचं. या कडी धुळ, वायू, लहान आकाराचे दगड यापासून बनलेल्या असतात. त्यात बर्फ साठलेला असतो. या कडी वितळत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्याचं पाणी अतिशय प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर पडतं त्यामुळे त्याचा पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. नासाच्या कॅसिनि स्पेसक्राफ्टने (Cassini spacecraft) शनीच्या या कडींचा अभ्यास केला असून त्यासंदर्भात काही आकडेवारीही जाहीर केली आहे. पुढच्या 10 ते 30 कोटी वर्षांमध्ये या कड्या नष्ट होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बर्फाच्या कडी जेव्हा वितळून त्याचं पाणी पृथ्विवर पडतं तेव्हा त्याचा वेग एवढा असतो की अर्ध्या तासात एक मोठ्या स्विमिंग पूलात बसेल एवढं पाणी खाली येतं. या संदर्भात अजुनही अभ्यास सुरू असून त्यात जशी प्रगती होत जाईल तशी माहिती बाहेर येणार आहे. हेही वाचा - सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने घेतला मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय चर्चा जगातील सर्वात भयंकर मासा! फक्त एक थेंब विषानेच घेऊ शकतो कित्येकांचा जीव    
    First published:

    Tags: Nasa, Planet

    पुढील बातम्या