नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांचा नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा

'नोटाबंदीच्या धोरणाला मी फार पूर्वीपासून पाठिंबा दिला आहे. रोख चलनविरहित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने टाकलेल्या या पहिल्या प्रयत्नामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास सुरुवात करता येईल'.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 04:13 PM IST

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांचा नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा

10 ऑक्टोबर: अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर झालेले डॉक्टर रिचर्ड एच थॅलर यांनी नोटाबंदीला पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाला पॉल क्रुग्मन,अर्मत्य सेनसारख्या अनेक अर्थतज्ञांनी विरोध केला होता.

'नोटाबंदीच्या धोरणाला मी फार पूर्वीपासून पाठिंबा दिला आहे. रोख चलनविरहित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने टाकलेल्या या पहिल्या प्रयत्नामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास सुरुवात करता येईल'. असं ट्विट त्यांनी पूर्वी केलं होतं. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा थॅलर यांनी हे ट्विट करून त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता.

बिहेवियरल इकोनॉमिक्स या विषयामध्ये थॅलर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. डॉ. थॅलर यांनी अर्थशास्त्रातील निर्णयप्रक्रियेतील विश्लेषणाद्वारे मानसशास्त्रीय वास्तववादी कल्पनांचे गृहितक मांडले होते. डॉ. थॅलर हे शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस या शैक्षणिक संस्थेत वर्तणूकविषयक अर्थशास्त्राचे (behavioural economics) प्राध्यापक आहेत. डॉ. थॅलर हे ‘नड्ज’ (2008) या बेस्ट सेलर पुस्तकाचे सहलेखक आहेत. कास आर. सनस्टेन यांच्यासोबत त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकामध्ये व्यक्तीच्या वर्तणुकविषयक अर्थशास्त्राद्वारे त्याच्या जीवनात येणाऱ्या महत्वाच्या अडचणींवर मात कशी करायची, याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...