रशिया : सेंट पीटर्सबर्गमधील सुपरमार्केटमध्ये स्फोट, 10 जखमी

रशिया : सेंट पीटर्सबर्गमधील सुपरमार्केटमध्ये स्फोट, 10 जखमी

शहरातील एका सुपरमार्केटमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास स्फोट झाला.

  • Share this:

27 डिसेंबर : रशियाच्या सेंट पीटसबर्ग शहरात एका मार्केटमध्ये स्फोट झालाय. या स्फोटात 10 जण जखमी झाले आहे. हा स्फोट नेमका कशाच होता हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

जगभरात ख्रिसमसची धूम सुरू आहे. अशातच सेंट पीटसबर्ग शहरातील एका सुपरमार्केटमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास स्फोट झाला. सुपरमार्केटमधील गोडाऊनमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात 10 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता याबद्दल रशियन प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नसून तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार. हा 200 ग्राम टीएनटी क्षमतेचा स्फोट होता. त्यामुळे सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 11:47 PM IST

ताज्या बातम्या