• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • दरवर्षी पृथ्वीवर धडकतात 17 हजार उल्का, या भागात सर्वाधिक धोका

दरवर्षी पृथ्वीवर धडकतात 17 हजार उल्का, या भागात सर्वाधिक धोका

जिओफ्री ईवाट यांच्याकडे 1988 पासून मार्च 2020 पर्यंत पृथ्वीवर किती वेळा उल्कापात झाला याची संपूर्ण माहिती आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 मे : आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उल्कापात होतो. प्रत्येकवेळी तो आपल्याला दिसतो किंवा माहिती मिळते असं नाही पण एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला 17 हजारहून अधिकवेळा उल्कापात होतात. त्यातील काही उल्कापाताचे अवशेष मिळतात तर काही नाही. सर्वात जास्त उल्कापाताचं प्रमाण भूमध्य रेखा असलेल्या भागांमध्ये आहे. जिओफ्री ईवाट नावाच्या एका शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका इथे अभ्यासादरम्यान याबाबत खुलासा केला. ईवाट हे इंग्लंडमधील युनिवर्सिटी ऑफ मॅन्चेस्टरमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अंटार्क्टिकातील रिसर्चचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सहकार्यांसह त्यांची उल्कापाताचा रिसर्च करण्यास सुरुवात केली. अंटार्क्टिकामध्ये फिरत असताना त्यांना उल्कापाताचे काही अवशेष मिळाले. 1988 पासून मार्च 2020 पर्यंत पृथ्वीवर किती वेळा उल्कापात झाला याची संपूर्ण माहिती जिओफ्री यांच्याकडे असल्याचं ते सांगतात. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) आणि नासा यांनी तयार केलेला हा नकाशा पृथ्वीवरील सर्वात जास्त उल्कापात कोणत्या ठिकाणी झाला हे सांगतो. जिओफ्री य़ांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही परिसर निवडले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत त्याचा 2 वर्ष अभ्यास केला. ऊन किंवा उष्णता वाढते त्यावेळी त्या परिसरांमध्ये उल्कापाताचा अभ्यास त्यांनी केला. उल्कापातमुळे परिसरातील उष्णता कमालिची वाढते. त्याचा परिणाम काय होतो याचाही अभ्यास केला आणि 29 एप्रिल रोजी जिओलॉजी मॅगझिनमध्ये त्यांनी आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पृथ्वीवर 17 हजार उल्का पडतात असंही त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा-'गल्ली क्रिकेट'मध्ये फलंदाजाने मारला विचित्र छक्का,60 लाख वेळा पाहिला गेला VIDEO ईवाट यांच्या म्हणण्यानुसार अंटार्क्टिकामध्ये झालेल्या उल्कापाताची संख्या मोजण इतर ठिकाणपेक्षा अधिक सोपं आहे. पण उल्काचे दगड जर बर्फाच्या आत खोलवर गेले तर मात्र शोधणं खूप अवघड आणि जिकरीचं होऊन जातं. अनेकदा बर्फाचे तुकडे होतात किंवा समुद्रात पडले तर शोधणं शक्य होत नाही. नॉर्वेतील अनेक भागांमध्ये उल्कापात तुम्हाला सहज पाहाता येईल. डोळ्यांना दिसेल असा हा उल्कापात होतो. आपल्याला तेथील नॉर्दर्न लाइट्सचे सुंदर दृश्य देखील पाहायला मिळेल. हे वाचा-राणू मंडल नंतर व्हायरल होतंय या गायकाचा VIDEO, गायलं बाहुबलीतील सर्वात कठीण गाणं संपादन- क्रांती कानेटकर
  Published by:Kranti Kanetkar
  First published: