Home /News /videsh /

धक्कादायक! कोरोनामुळे 'या' देशात तब्बल 1 कोटी 85 लाख लोकं होणार बेरोजगार

धक्कादायक! कोरोनामुळे 'या' देशात तब्बल 1 कोटी 85 लाख लोकं होणार बेरोजगार

कोरोनाव्हायरसमुळे सर्व देशांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे येत्या काळात कोट्यावधी लोकांना याचा फटका बसू शकतो.

    इस्‍लामाबाद, 28 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे सर्व देशांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. संपूर्ण जगात लॉक डाऊनमुळे आणि हवाई प्रवासावरील बंदीमुळे आयात निर्यातीबरोबर इतरही उद्याग धंदे ठप्प झाले आहे. त्यामुळे येत्या काळात तब्बल 1 कोटी 85 लाख लोकं बेरोजगार होऊ शकतात. कोरोनानंतर पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचे संकट निर्माण होऊ शकते. फक्त पाकिस्तानच नाही तर भारतासह अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांमध्येही अशा परिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानच्या केंद्रीय नियोजन मंत्रालयाशी संबंधित पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आपल्या संशोधनात असा दावा केला आहे. या अहवालात, कोरोना विषाणूमुळे लवकरच आर्थिक मंदी येऊ शकते. याचा थेट परिणाम रोजगारावर होणार आहे. हा परिणाम सुरुवातीच्या तीन टप्प्यात होईल. ज्येष्ठ आर्थिक संशोधक महमूद खालिद, मुहम्मद नासिर आणि नसीम फराज यांच्या या अहवालानुसार, 'जर पाकिस्तानमधील व्यवसायिक जीवन पूर्णपणे बंद झाले तर ते एक कोटी, 85 लाख, 30 हजार लोकं बेरोजगार होतील', असा दावा केला आहे. वाचा-पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण? एका बातमीने पाक हादरलं वेतन व्यवसायावर वाईट परिणाम होईल या संकटाच्या परिणामाचा सर्वात मोठा परिणाम किरकोळ व्यवसायावर होणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. रिटेलमधील बर्‍याच नोकऱ्या बंद होतील. त्याच वेळी, शेती, उत्पादन, हॉटेल आणि मत्स्यपालनावर आणि दैनंदिन कामात किंवा फेरीवाल्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर वाईट परिणाम होईल. ज्येष्ठ संशोधक महमूद खालिद यांनी 'उर्दू न्यूज'ला सांगितले की पाकिस्तान सरकारला या संकटाचा सामना करणे कठीण काम आहे, कारण कोरोना विषाणूचा परिणाम रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन न केल्यास, कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या वाढेल. तर फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सरचिटणीस डॉ. बिलाल थहीम यांनी, पाकिस्तानपेक्षा युरोपियन बाजारपेठ जास्त संकटात आहे. स्थानिक पातळीवर उद्योग आणि व्यापार यांना सरकारने पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला तरीही पाकिस्तानच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होईल, कारण परदेशातून ऑर्डर मिळणार नाहीत. वाचा-अमेरिकेत 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 लोकांचा मृत्यू निर्यातीच्या दिशेने कोरोना संकट एक चांगली संधी आहे त्याच वेळी एफपीसीसीआयचे सरचिटणीस बिलाल थहीम यांनी, "कोरोना संकटाचादेखील पाकिस्तानी निर्यातीवर सकारात्मक परिणाम होईल, कारण वैद्यकीय पुरवठा जगभरात वाढेल. पाकिस्तानला शस्त्रक्रिया उत्पादने, मुखवटे आणि वैद्यकीय गाऊन निर्यात वाढवण्याची ही एक उत्तम संधी आहे", असे सांगितले. तर , पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पाकमध्ये रुग्णांची संख्या 1 हजार 363 झाली आहे. तर, आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर, चांगली बातमी म्हणजे 23 लोकं निरोगी झाली आहेत. वाचा-असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या