'आधी ओबामांनी वापरलेले टॉयलेट हटवा', व्हाऊस हाऊसमध्ये येण्यापूर्वी ट्रम्प यांच्या पतीची होती अट

'आधी ओबामांनी वापरलेले टॉयलेट हटवा', व्हाऊस हाऊसमध्ये येण्यापूर्वी ट्रम्प यांच्या पतीची होती अट

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांच्या माजी सल्लागार आणि जवळच्या मैत्रिणीने एका पुस्तकातून हा खुलासा केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 31 ऑगस्ट : मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांनी व्हाइट हाऊस (White House) मध्ये जाण्यास मनाई केल्याची बाब एका कादंबरीतून समोर आली आहे. जोपर्यंत ओबामा यांच्या बेडरुममधील टॉयलेट हटवून (Remove Barack Obamas used Toilet) नवीन लावून दिलं जात नाही, तोपर्यंत व्हाइट हाऊसमध्ये जाणार नसल्याचं मेलानिया यांनी सांगितलं होतं.

मेलानिया ट्रम्प या व्हाइट हाउसच्या क्वार्टरला कचराकुंडी समजत होत्या. या सर्व गोष्टी त्यांच्या माजी सल्लागार आणि कोणी एके काळी चांगली मैत्रिण असलेली स्टेफनी विस्टन वॉल्कॉफ यांनी आपल्या पुस्तकात 'मेलानिया आणि मी : पहिली महिलेसोबतच्या मैत्रीतील चढ-उतार' (Melania and Me: The Rise and Fall of My Friendship with the First Lady) मध्ये सविस्तर लिहिली आहे.

रिपोर्टच्या अनुसार स्टेफनीने कथित स्वरुपात इवांका ट्रम्पच्या विरोधात कडक टीका करणारी फर्स्ट लेडीचा संवाद चोरुन टेप केल्यानंतर आणि त्यांच्या पतीला ट्रोल केल्यानंतर ही वादग्रस्त कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीनुसार मेलानियाने जोपर्यंत त्यांच्या बेडरुम आणि अन्य खोल्यांमध्ये बदल करीत नवीन रुप दिलं जात नाही, तोपर्यंत व्हाइट हाऊसमध्ये जाण्यास नकार दिला. त्यांनी बेडरुम आणि शॉवर पाहत नव्या वस्तुंची मागणी केली.

मेलानिया कोणी वापरलेल्या बाथरुमचा पुन्हा वापर करू इच्छित नव्हती, मग ते ओबामा असो वा क्वीन एलिजाबेथ. त्यांना सेकंड हँड वस्तू वापरायला आवडत नाही. स्टेफनीने तिच्या कादंबरीत दिल्यानुसार वास्तवात मेलानिया यांना घरातील सजावटीची जास्त काळजी असते.

हे वाचा-मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन माशांचा खच; चिंता वाढवणारे Photo आले समोर

या कादंबरीची लेखिका स्टेफनी विंस्टन वॉल्कॉफ यांनी वोग मासिकासाठी काम केलं आहे आणि साधारण 10 वर्षांपर्यंत त्या न्यूयॉर्क सिटीत एका प्रतिष्ठित मेट बॉलची योजना तयार करण्यासाठी मदत केली आहे. स्फेटनी पहिल्यांदा मेलानिया यांना 2003 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नात्यात असताना भेटली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: August 31, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या