Home /News /videsh /

दर मिनिटाला 3 लोकांचा मृत्यू, अमेरिकेनं गेल्या 24 तासांत मोडले कोरोनाचे सर्व विक्रम

दर मिनिटाला 3 लोकांचा मृत्यू, अमेरिकेनं गेल्या 24 तासांत मोडले कोरोनाचे सर्व विक्रम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली असली, मृतांचा आकडा कमी होत नाही आहे.

    वॉशिंग्टन, 17 एप्रिल : अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली असली, मृतांचा आकडा कमी होत नाही आहे. गेल्या 24 तास अमेरिकेत 4 हजार 591 रुग्णांच्या मृत्यूचा रेकॉर्ड झाला. 24 तासात आतापर्यंत सर्वात जास्त मृतांची नोंद अमेरिकेत झाली आहे. यासह अमेरिकेतील मृतांची संख्या 34 हजार 562 झाली आहे. तर, 6 लाख 75 हजार 243 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत प्रत्येक मिनिटाला तीन लोकांचा मृत्यू होत आहे. जगभरात अमेरिका इटली, स्पेन, फ्रान्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे. दरम्यान या काळात अमेरिकेत जीवितहानीसोबतच व्यवहार आणि व्यवसाय ठप्प असल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर काय नियम पाळायचे या संदर्भात ट्रम्प यांनी आज जनतेला संबोधित केले. वाचा-अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी कसली कंबर अखेर अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन टप्पे सांगितले आहेत. या तीन फेजेसचं पालन करणं आवश्यक आहे. प्रत्येक राज्यासाठी फेजनुसार नियमावली असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात (first phase )मध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन कऱणं आवश्यक आहे. त्यामध्येही 10 पेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंगमध्ये असू नयेत. ज्यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी आपल्या घरी सुरक्षित राहावं. विनाकारण घराबाहेर पडू नये अथवा प्रवास करणं टाळावं. तिसऱ्या टप्प्यात गर्दी न करता अशा ठिकाणांवर एकमेकांसोबत संपर्क आल्यास त्यातील वेळ कमी ठेवाव. कामाव्यतिरिक्त वेळ घालवत गर्दीच्या ठिकाणी थांबू नये. बार, जिम, किंवा मोठ्या स्थानकांवर कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठे बदल करावे लागतील. वाचा-अखेर न्यूयॉर्कमध्येही 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला; धोका कमी होत असला तरी सतर्कता न्यूयॉर्कमध्येही 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला न्यूयॉर्कचे महापौर अॅऩ़्ड्र्यू क्युयोमो यांनी आज न्यूयॉर्क राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवित असल्याचे जाहीर केले. सध्या येथील परिस्थिती सुधारत आहे. असे असले तरी आतापर्यंत घेत असलेल्या उपाययोजना यापुढेही घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. मला कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या अधिक कमी झालेली पाहायची आहे. नव्या अपडेटनुसार न्यूयॉर्कमध्ये 606 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या