• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • पाठीवर दप्तर आणि चेहऱ्यावर हसू, Real Life Mowgli जंगल सोडून सुटाबुटात पोहोचला शाळेत

पाठीवर दप्तर आणि चेहऱ्यावर हसू, Real Life Mowgli जंगल सोडून सुटाबुटात पोहोचला शाळेत

Real life Mowgli, फोटो सौ.- द सन यूएस

Real life Mowgli, फोटो सौ.- द सन यूएस

आफ्रिकेतल्या रवांडा (Rwanda) या देशात झंझीमन एली (Zanziman Ellie) नावाचा एक मुलगा राहतो. त्याची तुलना जंगलबुकमधल्या मोगलीशी केली जात आहे. अनेक जण त्याला 'रिअल लाइफ मोगली' या नावानं ओळखतात

  • Share this:
'दी जंगलबुक' नावाचं कार्टून आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेल. किंबहुना अनेकांनी ते पाहिलं देखील असेल. विशेषत: नव्वदच्या दशकात जन्मलेल्या मुलांचं बालपण तर या कार्टूनशिवाय अपूर्णचं आहे. जंगलबुकमधल्या मोगली, बघीरा, शेरखान या पात्रांचा एक अमीट ठसा मुलांच्या मनावर उमटलेला आहे. काही दिवसांपूर्वी यावर आधारित एक अॅनिमेशनपटदेखील आला होता. त्यालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. आफ्रिका खंडातल्या एका अनोख्या मुलाच्या निमित्ताने जंगलबुक आणि त्यातलं मोगलीचं पात्र पुन्हा चर्चेत आलं आहे. आफ्रिकेतल्या रवांडा (Rwanda) या देशात झंझीमन एली (Zanziman Ellie) नावाचा एक मुलगा राहतो. त्याची तुलना जंगलबुकमधल्या मोगलीशी केली जात आहे. अनेक जण त्याला 'रिअल लाइफ मोगली' या नावानं ओळखतात. कारण तो मोगलीप्रमाणेच जंगलातच राहत होता. या रिअल लाइफ मोगलीनं आता शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. वाचा-क्या बात! फक्त चिकन खा आणि मिळवा 1 लाख रुपये पगार, Job साठी असं करा अप्लाय एखादी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा वेगळी दिसत असेल तर त्याला चिडवलं किंवा हिणवलं जातं. रवांडात 1999 साली जन्मलेला झंझीमनदेखील या प्रवृत्तीचा बळी ठरला होता. झंझीमनला एक दुर्मीळ आजार आहे. तो जन्मापासून मायक्रोसेफॅली (Microcephaly) विकाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याची आणि शरीराची ठेवण सामान्य माणसांप्रमाणे नव्हती. शरीराच्या तुलनेत त्याच्या डोक्याचा आकार लहान होता. वाढत्या वयासोबत त्याच्या चेहऱ्यामोहऱ्यात होणाऱ्या बदलामुळे अनेकांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली, अशी माहिती 'द सन यूएस'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून झंझीमन जंगलामध्ये राहू लागला. त्याला परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आलं नाही. घरी आणल्यानंतर तो पुन्हा जंगलात पळून जात असे. त्याला लहानपणापासून प्राण्यांचा लळा लागला होता. अशा प्रकारे त्यानं आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ जंगलांमध्येच काढला. त्यामुळं त्याला रिअल लाइफ मोगली म्हणून ओळखलं जाऊ लागलं. Atinkanews या स्थानिक न्यूजसाइटने दिलेल्या माहितीनुसार, झंझीमन एली आता हळूहळू सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे.  एका स्पेशल स्कूलमध्ये त्याचं नाव घालण्यात आलं आहे. शिवाय आता तो त्याच्या घरात राहत असून त्यानं शर्ट-पॅन्टसारखा नॉर्मल पोशाखदेखील घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी त्याच्यावर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. त्या माध्यमातून लोकांना झंझीमनबद्दल माहिती कळली. त्याला जंगलातून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. अफ्रिमॅक्स टीव्हीनं झंझीमनसाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली होती. जगभरातल्या अनेक नागरिकांनी झंझीमनसाठी आर्थिक मदत दिली. या पैशातून झंझीमन आणि त्याचं कुटुंब आरामात आयुष्य जगू शकतात. वाचा-पोप फ्रान्सिस यांच्या टोपीवर डोळा; मुलाने भर कार्यक्रमातच काय केलं पाहा VIDEO झंझीमनसारख्या अनेक व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत. निसर्गाच्या कलाकारीमुळे त्या काही गोष्टींमध्ये वेगळ्या असतात. त्यांच्या वेगळेपणाची खिल्ली न उडवता त्यांना मदत केली तर नक्कीच त्यांचं आयुष्य सुकर होऊ शकतं.
First published: