• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • अमेरिकेकडून मोठी चूक; काबूल विमानतळावरील ड्रोन हल्ल्यात 10 निष्पाप नागरिकांचा मृत्यू, मागितली माफी

अमेरिकेकडून मोठी चूक; काबूल विमानतळावरील ड्रोन हल्ल्यात 10 निष्पाप नागरिकांचा मृत्यू, मागितली माफी

29 ऑगस्टला अमेरिकेनं काबूल विमानतळानजीक ड्रोन स्ट्राईक (Drone Strike) केला. परंतु, या हल्ल्यात निष्पाप अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला.

  • Share this:
वॉशिंग्टन 18 सप्टेंबर : अमेरिकेनं (America) नुकतंच अफगाणिस्तानमधून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेतलं. त्यानंतर अल्पावधीतच तालिबानींनी (Taliban) संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. या घटनेनं मात्र अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. तालिबान्यांच्या कृतीमुळं अफगाणिस्तानमध्ये अराजक स्थिती निर्माण झाली. मोठ्या संख्येनं अफगाणी नागरिक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते. काबूल विमानतळावर यामुळं मोठी गर्दी उसळली होती. मात्र इसिस (ISIS) काबूल विमानतळावर (Kabul Airport) हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला (American Intelligence Agency) मिळाली. त्यामुळं 29 ऑगस्टला अमेरिकेनं काबूल विमानतळानजीक ड्रोन स्ट्राईक (Drone Strike) केला. परंतु, या हल्ल्यात निष्पाप अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. यावर आता अमेरिकेनं स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. `दैनिक भास्कर`नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 29 ऑगस्टला काबूलमध्ये करण्यात आलेल्या ड्रोन स्ट्राईकमध्ये 10 अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले. यात 7 मुलांचा समावेश होता. इसिस काबूल विमानतळावर हल्ला करणार असल्याची ठोस माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळं या अनुषंगानं हा ड्रोन स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती अमेरिकी सैन्याच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेंजी यांनी दिली. काबूलमधील ड्रोन स्ट्राईकनंतर अमेरिकेनं याबाबत निवेदन जारी केलं आहे. तालिबानशी हातमिळवणी करणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की, न्यूझीलंडनं दिला झटका ``ज्या ठिकाणाहून इसिसचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ल्याची तयारी करत होते, ते ठिकाण अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला समजले. एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटो कोरोला गाडीवर नजर ठेवा. या गाडीचा वापर इसिस करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनं अमेरिकी सैन्याला दिली होती. त्यानंतर अमेरिकी सैन्यानं 8 तास या गाडीवर पाळत ठेवली आणि इसिसच्या हालचाली बघून ठरवलेल्या ठिकाणाहून तिला लक्ष्य करण्यात आलं. परंतु, या गाडीविषयी गुप्तचर यंत्रणेनं दिलेली माहिती चुकीची निघाली,`` असं मॅकेंजी यांनी सांगितलं. ``काबूल विमानतळावर आमच्या एअरलिफ्ट ऑपरेशन (Airlift Operation) दरम्यान इसिस हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन ड्रोन स्ट्राईक करण्यात आला. दरम्यान आम्हाला यासंबंधी 60 धमक्या मिळाल्या होत्या. जेव्हा आम्ही ड्रोन स्ट्राईकचा निर्णय घेतला तेव्हा त्या ठिकाणी सामान्य नागरिक आम्हाला दिसला नाही``, असं मॅकेंजी यांनी ड्रोन हल्ल्याचं समर्थन करताना सांगितलं. तालिबानने दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी या घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे. ``काबूलमधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियां प्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो. या घटनेबाबत आम्ही माफी मागतो आणि या मोठ्या चूकीपासून आम्ही नक्की धडा घेऊ``, असं सांगितलं. पांढऱ्या रंगाची संशयित कार स्फोटकांनी भरलेली असावी, असं अमेरिकी सैन्याला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात त्या कारमध्ये पाण्याचे कॅन ठेवले असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अफगाणी नागरिकांच्या कुटुंबीयांना भरपाई कशी द्यावी, याबाबत अमेरिकी सरकार विचार करत असल्याचं मॅकेंजी यांनी सांगितलं.
First published: