Home /News /videsh /

म्हणे मोबाईलमुळे वाढतायत बलात्कार, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा जावईशोध

म्हणे मोबाईलमुळे वाढतायत बलात्कार, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा जावईशोध

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी आता आणखी एक विचित्र विधान (statement) केलं आहे.

    लाहोर, 26 ऑगस्ट : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी आता आणखी एक विचित्र विधान (statement) केलं आहे. मोबाईलमुळे (Mobile) बलात्कार (rape) वाढत चालले असून याला आळा घालण्यासाठी उपाय करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे शिक्षणासंबंधीच्या एका जाहीर व्याख्यानात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. काय म्हणाले इम्रान खान लाहोरमध्ये आयोजित पंजाब शिक्षण सम्मेलनात बोलताना इम्रान खान यांनी तंत्रज्ञान आणि नैतिकता यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मोबाईलच्या दुरुपयोगामुळेच तरुणांच्या नैतिकतेवर परिणाम होत असून त्यामुळे देशातील बलात्कार वाढत असल्याचं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं. तरुणांच्या हातात तंत्रज्ञान तर पडलं आहे, मात्र ते हाताळत असताना आवश्यक असणारी नैतिकता मात्र त्यांच्याकडे नसल्याचं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीला नैतिकतेची साथ मिळाल्याशिवाय एक सुसंस्कृत समाज घडू शकत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पाकिस्तानमधील टिकटॉक स्टारसोबत समूहानं केलेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे. काय घडलं टिकटॉक स्टारसोबत? द एक्सप्रेस ट्रिब्युन या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही टिकटॉक स्टार मीनार-ए-पाकिस्तानजवळ एक व्हिडिओ शूट करत होती. यावेळी तिथं जमाव गोळा झाला. जमावातील लोकांनी या टिकटॉक स्टारला उचलून घेतलं. काहींना तिच्या अंगावरचे कपडेदेखील फाडले. सुमारे 400 लोकांच्या समूहानं केलेल्या या कृत्याची तक्रार टिकटॉक स्टारनं नोंदवली होती. त्यावरून पाकिस्तानमधील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हे वाचा - काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण मीनार-ए-पाकिस्तानपाशी घडलेली घटना ही अस्वस्थ करणारी असून समाजाची महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलत चालल्याचं हे लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये महिलांना सर्वोच्च सन्मान मिळत होता. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आता काळ बदलत चालल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Mobile, Pak pm Imran Khan, Rape

    पुढील बातम्या