Home /News /videsh /

बलात्काराच्या गुन्हेगाराला रासायनिक पद्धतीनं करणार नपुंसक; भारताशेजारील देशाने घेतला मोठा निर्णय

बलात्काराच्या गुन्हेगाराला रासायनिक पद्धतीनं करणार नपुंसक; भारताशेजारील देशाने घेतला मोठा निर्णय

वारंवार बलात्काराच्या घटना घडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : पाकिस्तानने (Pakistan) बलात्कार (Rape) करणार्‍यांना केमिकल्सचा वापर करून नपुंसक बनवण्याची शिक्षा देण्याचा कायदा लागू केला आहे. जगातील इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा कायदा लागू आहे. पाकिस्तान सरकारने बलात्काराच्या गुन्ह्यासही नव्याने परिभाषित केले आहे. या गुन्ह्याखाली केवळ नपुंसकच नव्हे तर फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र फाशीची शिक्षा (Death Sentence) जाहीरपणे दिली जाणार नाही. या कायद्यासंदर्भात कायदामंत्री फारुघ नसीम म्हणतात की, आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार करता, नपुंसक होण्यापूर्वी दोषींची संमती घेणे आवश्यक असते. अन्यथा, नपुंसक ठरविण्याच्या निर्णयाला बलात्काराकडून कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. या शिक्षेवर फक्त कोर्टच शिक्कामोर्तब करू शकते. दोषींना काही काळासाठी किंवा संपूर्ण आयुष्यभर नपुंसक बनवायचे हेदेखील न्यायालय निर्णय देईल. कायद्याने अशीही तरतूद केली आहे की, बलात्काराचा दोषी आपली संमती देत ​​नसेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी किंवा वयाच्या 25  वर्षांची कैद केली जावी. हे ही वाचा-हिंदू तरुणींशी लग्न करण्यासाठी दिले जातात पैसे? 'Love Jihad फंडिंगची चौकशी करा' पाकिस्तानात बलात्काराच्या घटना वाढत आहेत.(Rape Incident) दरम्यान हा कायदा आणण्यात आला आहे. अलीकडेच सिंधमध्ये महिला व तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या घटनेनंतर स्वत: पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कठोर कायदे करण्याची सूचना दिली होती. मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये नवीन कायद्याला तत्वत: मान्यता देण्यात आली. यानंतर हा कायदा अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत विशेष न्यायालये आणि बलात्कारविरोधी सेल आणि साक्षीदाराच्या संरक्षणासाठी व्यवस्था करण्यात येईल. केवळ न्यायाधीश आणि वकील बलात्कार पीडितेशी प्रश्न-उत्तर करू शकतील. वादग्रस्त 'टू फिंगर टेस्ट' चा तपासही संपला नव्या कायद्यात पाकिस्तानने 'टू फिंगर टेस्ट' ची तरतूद दूर केली आहे. मानवाधिकार संघटनांनी ही तरतूद पीडित महिलांच्या सन्मानाविरूद्ध असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच त्यास अवैज्ञानिक म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानने बलात्काराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आधुनिक साधने आणि पद्धती अवलंबण्याची तरतूदही केली आहे. बलात्काराच्या व्याख्येत ट्रान्सजेंडर आणि सामूहिक बलात्काराचादेखील समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील हा एक मोठा निर्णय म्हणून पाहिले जात आहे. लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेसही तयार केला जाईल लैंगिक गुन्हेगारांचा राष्ट्रीय डेटाबेसही तयार करण्याची पाकिस्तानची योजना आहे. ज्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. सातत्याने बलात्कारासारखा गुन्हा करणाऱ्यांना रासायनिक पद्धतीने नपुंसक बनविणाऱ्या कायद्यामुळे घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी बलात्कार करणार्‍याला उघड्यावर फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी केली आहे तर काहींनी त्याला विरोध दर्शविला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gang Rape, Pakistan

    पुढील बातम्या