काठमांडू, 9 ऑगस्ट : नेपाळकडून वारंवार खोडसाळपणा सुरू असून सीमा विवाद, भगवान राम जन्मभूमीबाबत अद्यापही टिप्पणी सुरूच आहे. आता पुन्हा नेपाळने (Nepal) असंच वक्तव्य केलं आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा भगवान राम जन्मभूमी ही नेपाळमधील चितवन जिल्ह्यात असल्याचा दावा केला आहे. या जिल्ह्यात माडी नगरपालिका क्षेत्र आहे. ज्याचं नाव अयोध्यापुरी आहे.
शनिवारी ओली यांनी या भागाताली अधिकाऱ्यांनी फोनवर चर्चा केली. त्यांना राम, लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा लावण्याचे आदेश दिले. ओली यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की अयोध्यापुरीलाच खऱ्या अयोध्याच्या (Ayodhya) स्वरुपात प्रोजेक्ट आणि प्रमोट करावे.
हे वाचा-अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनानंतर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर झाला श्रीरामांचा जयघोष
नेपाळमधील हिमालयन टाइम्सनुसार ओली यांनी माडी आणि चितवनच्या अधिकारी आणि नेत्यांसोबत फोनवर 2 तास चर्चा केली. पुढील चर्चेसाठी त्यांना काठमांडू येथे बोलावण्यात आलं आहे. ओली म्हणाले, ' माझा विश्वास आहे की भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरीत झाला आहे. भारतातील अयोध्येत नाही. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ज्यातून भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचे सिद्ध होईल.
हे वाचा-अमेरिकेतही राममंदिराचा जल्लोष; Times Square वर झळकला अयोध्येचा राम, पाहा VIDEO
' चितवन जिल्याच्या खासदार दिल कुमारी रावल म्हणाल्या, ओली यांनी सांगितले की अयोध्यापुरीच्या जवळील भागात संरक्षणासाठी ताकदीनिशी काम करा. पुराव्या साठी अयोध्यापुरीमध्ये खोदकाम करण्यासही सांगितले आहे. याशिवाय ऐतिहासिक पुराव्यांसाठी स्थानिकांची मदत घेण्यास सांगण्यात आलं आहे.