अमेरिकेतही राममंदिराचा जल्लोष; Times Square वर झळकला अयोध्येचा राम, पाहा VIDEO

अमेरिकेतही राममंदिराचा जल्लोष; Times Square वर झळकला अयोध्येचा राम, पाहा VIDEO

आज सर्वच रामभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. अमेरिकेत रामनामाचा जयघोष केला जात होता.

  • Share this:

वॉशिंग्टन, 5 ऑगस्ट : देशभरात आज अयोध्येच्या राममंदिर भूमिपूजनानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेली रामभक्तांची इच्छा आज अखेर पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे भूमिपूजन केलं. याच्या पार्श्वभूमीवर आज न्यूयॉर्कमधील Times Square वर राम मंदिराची डिजिटल प्रतिकृती झळकली. रामाचा धनुष्यबाण घेऊन उभी प्रतीमा, राममंदिर आणि भारताचा झेंडा यावेळी टाइम्स स्क्वेअरवर झळकला.

टाइम्स स्क्वेअरवरील हा व्हिडीओ एएनआयने ट्विट केला आहे. देशात तर अनेक ठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

हे वाचा-अयोध्या राममंदिर भूमिपूजनानिमित्त माजी मुख्यमंत्री भजनात झाले तल्लीन; पाहा VIDEO

भारतातच नाही तर बाहेरही या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डिसीमध्ये भक्तांनी एकत्र येत प्रभू श्रीरामचा जयघोष केला. राम मंदिरासाठी होण्याऱ्या भूमिपूजनाचा उत्साह आणि आनंद त्यांनाही गगनात मावेनासा झाला होता. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही याचा आनंद आणि उत्साह साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 5, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या