होय, पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार- राहुल गांधी

पंतप्रधानपदाच्या उमेदवार होण्यास आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी प्रथमच जाहीरपणे कबूल केलंय. पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 02:37 PM IST

होय, पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार- राहुल गांधी

कॅलिफोर्निया, 12 सप्टेंबर : पंतप्रधानपदाच्या उमेदवार होण्यास आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी प्रथमच जाहीरपणे कबूल केलंय. पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ते सध्या अमेरिकेत आहेत. बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यापेक्षा उत्तम वक्ते असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी मान्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच सभेदरम्यान तीन-चार भिन्न समुहांना स्वतंत्रपणे संदेश देण्याची क्षमता ठेवतात. पण याच पंतप्रधानांनी विदेशात भारतियांचा जाहीरपणे अपमान केल्याचा आरोप करायलाही राहुल गांधी विसरले नाहीत. या भाषणादरम्यान राहुल गांधींनी तिथल्या विद्यार्थ्यांना भारताच्या ताकदीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसंच देशाच्या विकासासंदर्भात त्यांचे स्वतःचे व्हिजनही विद्यार्थ्यांपुढे ठेवले.

''मला बदनाम करण्यासाठी भाजपने 1 हजार तरुणांची फौज सोशल मीडियावर कार्यरत ठेवल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची ही सायबर फौज सातत्याने माझ्याविरोधात बदनामीकारक मजकूर व्हायरल करत असते. असंही त्यांनी म्हटलंय.

युपीए सरकारच्या काळात म्हणजेच 2013साली काही काँग्रेसी नेत्यांना सत्तेचा अंहकार जडल्यामुळेच आमचा पराभव झाल्याचंही राहुल गांधींनी यावेळी जाहीरपणे कबुल केलं. या पराभवातून काँग्रेस आता सावरत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय.

Loading...

युपीएच्या काळात जम्मू-काश्मीरचा हिंसाचार थांबवण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवली होती पण मोदी सरकारच्या ध्येयधोरणं बदलल्यामुळे तिथं पुन्हा हिंसाचारा बोकाळला असून हकनाक भारतीय सैनिक मारले जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय.

मोदी सरकारच्या काळात पत्रकारांच्या हत्या होताहेत. तसंच बीफसारख्या मुद्यांवरून विनाकारण मुस्लीम बांधवाना टार्गेट केलं जात असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. नोटबंदीमुळे देशातला शेतकरी उधवस्त झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. देशाची अर्थव्यवस्थाही मोदींच्या आडमुठेपणामुळे रसातळाला गेल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...