VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल, पाहून पडाल चाट

VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल, पाहून पडाल चाट

नंतर त्याने एक भन्नाट आयडिया लढवली. आपला ड्रोन काढला आणि त्याने त्यात आपला नंबर लिहून ती चिठ्ठी तिला पाठवली.

  • Share this:

न्यूयॉर्क 31 मार्च : अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. कायम गजबजलेलं असणारे न्यूयॉर्क शहर याचं केंद्रबिंदू आहे. सगळं शहरात सध्या भयाण शांतता आहे. असं असताना याच शहरात प्रेमही बहरून आलंय. प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणातात ते जेरेमी कोहेन या तरूणाने प्रत्यक्षात आणलं. घरातच बंद असताना त्याने आपल्या बाल्कनीमधून एका तरुणीला डान्स करताना पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला नंतर तिच्यासाठी त्याने जे केलं ते त्यापेक्षाही भन्नाट असं आहे.

फोटोग्राफर असणारा जेरेमी हा सध्या कोरोनामुळे शहर बंद असल्याने आपल्या घरात आहे. बाल्कनीत असताना आपल्या इमारतीच्या टेरेवर एक तरुणी डान्स करत असताना त्याने पाहिली. दोघांनीही एकमेकांना हाय, हॅलो केलं. पण तिची काहीच ओळख नसताना तिची माहिती कशी काढयाची हा त्याच्यापुढे प्रश्न होता.

नंतर त्याने एक भन्नाट आयडिया लढवली. आपला ड्रोन काढला आणि त्याने त्यात आपला नंबर लिहून ती चिठ्ठी तिला पाठवली. त्यानंतर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. बोलणही होत होतं. नंतर त्यांनी डेटला जायचं ठरवलं. त्यासाठी त्याने आणखी एक भन्नाट कल्पना लढवली.

त्याने एक ऑनलाईन फुगा मागवला. मग त्या फुग्याच्या माध्यमातून तो तिला भेटायला गेला. त्याच्या या प्रेमवेडाची टोरीनेही दाद दिली. या सगळ्यांचे व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर टाकले असून नेटकरी त्याला दिलखुलास प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा...

CM उद्धव ठाकरेंनी दिली ड्रायव्हरला सुट्टी, स्वत:च कार चालवत घेताहेत बैठका

NRI झाला बेघर, मुंबईतील मजूर आणि भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमधून घेतोय मदत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंनीही दिली देणगी

First published: March 31, 2020, 9:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading