पाकिस्तानची धूळफेक; 'जैश'च्या मुख्यालयावर कारवाईचं नाटक

भारताच्या इशाऱ्यानंतर जैश-ए- मोहम्मदवरती कारवाईचा पुन्हा एकदा दिखाऊपणा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 08:33 PM IST

पाकिस्तानची धूळफेक; 'जैश'च्या मुख्यालयावर कारवाईचं नाटक

कराची, 22 फेब्रुवारी : भारताच्या तसेच आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा दिखाऊपणा केला आहे. यावेळी पंजाब सरकारनं जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूरमधील मुख्यालयावर कारवाई करत कार्यालय ताब्यात घेतलं आहे. ANIनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.


">

Loading...

पंजाब सरकारची ही कारवाई म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. कारण, गुरूवारी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या अझर मसुदला आयएसआयचं मुख्य कार्यालय असलेल्या रावळपिंडी येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदच्या कार्यावरील कारवाई म्हणजे केवळ दिखाऊपणाच आहे.पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

पाक लष्कराची दर्पोक्ती

पाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पुलवामा हल्ल्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न करत असताना हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध न करता त्यांनी हल्ल्याचं अप्रत्यक्ष समर्थनच केलं. कर्नल असिफ गफुर यांनी लष्कराची भूमिका मांडत सर्व खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न केला.


पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आणखी आवळल्या जाणार; 'या' आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिला इशारा


पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे

- भारतात जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा अशा घटना घडतात.

- भारत सुरवातीपासून काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार करत आहे.

- काश्मीरातल्या एका तरुणाने पुलमावा इथं हल्ला घडवून आणला. पाकिस्तानात त्या काळात आठ महत्त्वाच्या घटना होत्या. त्यामुळे असं असताना आम्ही असा हल्ला का घडवून आणणं अशक्य नाही.

- गेली 70 वर्ष भारताचं सैन्य सीमेवर आहे. एवढं सैन्य असताना घुसखोरी होतेच कशी हा प्रश्न भारतीय सैन्याला विचारला पाहिजे.

- ज्या तरुणाने हल्ला घडवून आणला त्या तरुणाला भारतीय सैन्याने आधी अटक केली होती त्याला त्रास दिला होता. तो हल्ल्यासाठी का तयार झाला याचा विचार केला पाहिजे.

- कोणत्याही पुराव्याशीवाय भारत पाकिस्तानवर आरोप करतो. त्यामुळेच आम्ही यावेळी चौकशी करून प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यात आमचा हात नाही.

- आत्तापर्यंत कुणीच दिली नसेल अशी ऑफर पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली आहे.

- पाकिस्तान दहशतवादावरही बोलायला तयार आहे. मात्र तो प्रस्ताव भारत स्वीकारत नाही.

- पाकिस्तानकडून काही चुकाही झाल्या आहेत. पण आता चुकांना जागा नाही.

- आम्ही युद्धाची तयारी करत नाही आहोत तर युद्ध लादलं तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आमच्यात आहे. भारतानेच आम्हाला धमकी दिली आहे.

- हा पाकिस्तान नवा आहे. आम्हाला युद्ध नको आहे. पण आम्ही कमजोर नाही आम्ही पूर्ण ताकदीने प्रतिकार करू.

- आम्ही चर्चेचा प्रस्ताव देतोय, आम्ही मिळून चौकशी करण्याचाही प्रस्ताव देतो आहे. आम्ही पुढे जायचं आहे. नवी पीठी घडवायची आहे. आम्हाला युद्ध नको.

Special Report : मुंबईची लाईफलाईन दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट, पुढचे 3 महिने सावधान!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 08:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...