मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

रशियात शिकणाऱ्या पुण्यातल्या तरुणाचा मृत्यू; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नातून नातेवाईंकांना घडलं शेवटचं दर्शन

रशियात शिकणाऱ्या पुण्यातल्या तरुणाचा मृत्यू; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नातून नातेवाईंकांना घडलं शेवटचं दर्शन

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा रशियात कर्करोगामुळे मृत्यू (Indian student death in Russia) झाला होता. पण भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याचं पार्थिव मायदेशी आणण्यात अनेक अडचणी येत होत्या.

  • Published by:  News18 Desk
बारामती, 02 मे: काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा रशियात कर्करोगामुळे मृत्यू (Indian student death in Russia) झाला होता. पण भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याचं पार्थिव मायदेशी आणण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आपल्या मुलाचं शेवटचं दर्शनही नशिबात आहे की नाही? याबाबतची चिंता नातेवाईकांना सतावत होती. पण बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्ननानंतर कुटुंबीयांना आपल्या मुलाचं शेवटचं दर्शन मिळू शकलं आहे. संबंधित 22 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव तन्मय आबासाहेब बोडके असून तो इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील रहिवासी आहे. तो रशियात एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. रशियातील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. पण मागील काही दिवसांत त्याचं अचानक वजन वाढायला सुरुवात झाली. काही दिवसांतच त्याचं वजन इतक वाढलं की त्याला चालणंही मुश्किल झालं. रुग्णलयात शरीराची तपासणी केली असताना त्याला कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. कर्करोगावर शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक रक्तदाब कमी झाल्यानं त्याचा परदेशात मृत्यू झाला. एकिकडे भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, तन्मयचा परदेशात मृत्यू झाला. तसेच अनेक देशांनी भारतीय उड्डाणांवर विविध निर्बंध लादले आहेत. अशात तन्मयचा मृतदेह भारतात कसा आणायचा हा पेच कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता. यावेळी मृत चिन्मयचे नातेवाईक श्रीकांत बोडके यांनी ही बाब बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि रशियन दुतावासाशी संपर्क साधून मृत तन्मयचं पार्थिव मायदेशात आणण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर खा. सुळे यांच्या प्रयत्नांना यश मिळून अखेर मृतदेह भारतात आणणं शक्य झालं आहे. हे ही वाचा-कोरोनाचा धसका! आता नेपाळमध्येही भारतीयांना नो एन्ट्री; 22 प्रवेशद्वारं केली बंद दैनिक लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 29 एप्रिल रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तन्मयचा मृतदेह आणला असून तेथून रुग्णवाहिकेच्या मदतीनं मृतदेह मुळगावी आणण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी तन्मयवर मुळगावी पिंपरी बुद्रुक याठिकाणी अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोना काळात परदेशात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मुलाचं शेवटचं दर्शन होईल की नाही? याबाबत काहीही शक्यता नसताना, सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून नातेवाईकांना शेवटचं दर्शन घडलं आहे.
First published:

Tags: Death, India, Russia, Student

पुढील बातम्या