मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आली लहर, केला कहर! माथेफिरूनं पळवली SCHOOL BUS, चिरडल्या 20 गाड्या

आली लहर, केला कहर! माथेफिरूनं पळवली SCHOOL BUS, चिरडल्या 20 गाड्या

माथेफिरून शाळेच्या (Psycho steals school bus to dash 20 car) आवारात उभी असलेली स्कूलबस चोरून रस्त्यातील जवळपास 20 कारचा चुराडा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

सिएटल, 29 ऑक्टोबर: अमेरिकेच्या सिएटल शहरात राहणाऱ्या माथेफिरूच्या (Fear among citizen) या कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या माथेफिरूनला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

माथेफिरुला आली लहर

सिएटलमध्ये राहणाऱ्या एका माथेफिरूला लहर आल्यामुळे त्याने चक्क एक स्कूलबस पळवून नेली. बस सुरू करून तो शहरात आला. रस्त्यावर वेगाने बस चालवत त्यानं आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना धडका द्यायला सुरुवात केली. जिथं जिथं त्याला वाटेत कार पार्क केलेली दिसेल, तिथे जाऊन त्या कारला तो टक्कर द्यायचा. त्यानंतर एका बस स्टॉपवर त्याने बस थांबवली. मात्र काही क्षणांत पुन्हा बस सुरू करून त्याने बसस्टॉपची भिंतच तोडून टाकली आणि बस घेऊन पुढे निघाला.

पोलिसांनी केला पाठलाग

पोलिसांना नागरिकांनी फोन करून या घटनेची माहिती दिली. एक स्कूलबस रस्त्यावर प्रचंड वेगाने धावत असून इतर गाड्यांचं नुकसान करत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर तातडीने पोलिसांनी या बसचा पाठलाग सुरु केला. मात्र वेगाने बस चालवणारा माथेफिरू पोलिसांना शरण येत नव्हता. अखेर पोलिसांनी शिताफीनं त्याला पकडलं आणि स्टेअरिंगपासून बाजूला करत बस थांबवली. या माथेफिरूच्या शरीरावर अनेक जखमा होऊन तो गंभीर झाल्याचं पोलिसांना दिसलं. या घटनेत काही नागरिकांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी या माथेफिरुला अटक करून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

हे वाचा- Big News: देशभरात न्यूमोनिया प्रतिंबंधक लसीकरणाला सुरुवात; ही आहेत वैशिष्ट्यं

घटनेचं कारण गुलदस्त्यात

या माथेफिरूनं असं का केलं, याचं कुठलंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. वेडाच्या भरात त्यानं हे कृत्य केलं असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

First published:

Tags: America, Crime, Police