वाशिंग्टन, 25 ऑगस्ट : अमेरिकेची राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक 2020 (US Presidential elections 2020) साठी रिपब्लिकन पार्टीने सर्वसंमतीने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. डेमोक्रेटीक पार्टीकडून उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय मूळ असलेल्या कमला हॅरिस यांची निवड केल्यानंतर निवडणूक अधिक रोमांचकारी झाली आहे.
केवळ डेमोक्रेटीकचं नाही तर रिपब्लिकन्ससाठीही भारतीय आणि आशियाई मूळ असलेले मतदार महत्त्वाचे झाले आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प समर्थन नवनव्या क्लृप्त्या शोधत आहेत. अशाच एका प्रयत्नांच्या दरम्यान ट्रम्प समर्थक टोमी लॅरेन (Tomi Lahren) ही सोशल मीडिया बरीच ट्रोल झाली आहे.
हे वाचा-फिलीपीन्सच्या दक्षिण भागात दहशतवादी हल्ला; बॉम्ब स्फोटात 14 जणांचा मृत्यू
My fellow Indians, Tomi Lahren thanks you for your support for Trump and his MAGA agenda.
If you’re wise, you’ll watch until the end #IndiansForTrump #MAGA2020 #maga #RNC2020 #rnc #Modi pic.twitter.com/06MjXSL7lK
— Ali-Asghar Abedi (@AbediAA) August 24, 2020
अमेरिकन कंजर्वेटिव कमेंटेटर आणि टेलीविजन होस्ट टोमी लॅरेन ट्रम्पची समर्थन आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून ट्रम्प यांच्यासाठी समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. व्हिडीओमध्ये टोमी भारतीय लोकांना ट्रम्प यांचे कॅम्पेन मेक अमेरिका ग्रेम अगेन याला समर्थन देण्यासाठी आभार व्यक्त करीत होती. यावेळी तिने भारतीयांना आकर्षित करण्यासाठी काही हिंदी शब्दांचा उपयोग केला. यावेळी ती म्हणाली, ट्रम्प 'उल्लू' (घुबड) प्रमाणे गतीमान आणि समजूतदार आहेत. जरी अमेरिकेत घुबडाला गतीमान आणि समजूतदार मानलं जात असलं तरी भारतात याचा अर्थ वेगळाच आहे. टोमी हिचा ट्रम्प यांना उल्लू म्हणजेच घुबड म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.