नाव मोठं अन्..' दुबईच्या शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डशी अनैतिक संबंध, नातं लपवयला चारले कोट्यवधी रुपये

नाव मोठं अन्..' दुबईच्या शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डशी अनैतिक संबंध, नातं लपवयला चारले कोट्यवधी रुपये

नाव मोठं अन् लक्षण खोटं अशी म्हण मराठीत आहे. त्याचाच प्रत्यय दुबईच्या शासकाच्या पत्नीच्या बाबतीत आला आहे.

  • Share this:

दुबई 21 नोव्हेंबर: दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमच्या (Dubai's Ruler Sheikh Mohammed Al Maktoum) पत्नीचे त्यांच्यात बॉडीगार्डशी अनैतिक संबंध होते. राजकुमारी हया म्हणजेच शासकाच्या पत्नीने याबाबत गुप्तता राखण्यासाठी बॉडीगार्डला तब्बल 12 कोटी रुपये दिले होते. दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमने त्याच्या पत्नीला सन 2019मध्ये घटस्फोट दिला होता. ब्रिटनच्या कोर्टात या घटस्फोटाची सुनावणी झाली होती.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, राजकुमारी हयाचा बॉयफ्रेंडही विवाहित होता. त्यांच्या अनैतिक संबंधांमुळे त्या बॉडीगार्डचही लग्न तुटलं. राजकुमारी हया आता ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. तिने आपल्या मुलांची कस्टडी स्वत:कडे ठेवली आहे. ब्रिटनच्या न्यायालयात अनेक वर्ष हा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल हयाच्या बाजूने लागला आहे. राजकुमारी हया तिच्या बॉयफ्रेंडला अनेक महागडी गिफ्ट देत असे. यामध्ये 12 लाखांचं घड्याळ आणि 50 लाखांची बंदूक अशा महागड्या गोष्टींचा समावेश होता.

शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमची ती सर्वात धाकटी आणि सहावी पत्नी होती. सन 2016 पासून त्यांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. तिचा बॉयफ्रेंड आधी सर्वांचा बॉडीगार्ड म्हणून काय करायचा पण त्यांचं अफेअर सुरू झाल्यानंतर तो फक्त तिच्यासाठीच काम करू लागला. राजकुमारी हयाच्या बॉयफ्रेंडचं नाव रसेल फ्लॉवर होतं. त्यांचं अफेअर जवळजवळ 2 वर्ष चाललं. राजकुमारी हयाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच अन्य 3 सुरक्षा रक्षकांना अनैतिक संबंधांबाबत गुप्तता राखण्यासाठी पैसे चारले होते.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, राजकुमारी हया आता तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये राहते. त्यांच्या संबंधांबद्दल तिच्या बॉयफ्रेंडला विचारलं असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर राजकुमारी हया हिने या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचं ठासून सांगितलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 21, 2020, 6:21 PM IST

ताज्या बातम्या