प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी का घेतला शाही राजघराणं सोडण्याचा निर्णय?

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी का घेतला शाही राजघराणं सोडण्याचा निर्णय?

ब्रिटनचा राजकुमार असलेल्या हॅरीने त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिच्यासह राजघराण्यातील पद सोडून अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

लंडन, 12 जानेवारी : प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांनी शाही राजघराणं सोडून अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची काहींनी खिल्ली उडवली तर काहींनी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले आहेत. महाराणी एलिझाबेथचा नातू आणि ब्रिटनचा राजकुमार असलेल्या हॅरीने त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिच्यासह राजघराण्यातील पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वावलंबी होण्यासाठी स्वतंत्र काम करणार असल्याचंही म्हटलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या या निर्णयामागे मेगन कृष्णवर्णीय असणं हे कारण असल्याची चर्चा सुरू आहे. ब्रिटनमधील कृष्णवर्णीय नागरिकांनी असा दावा केला आहे की, मेगनला तिच्या रंगावरून टार्गेट केलं जात होतं. काही ठराविक माध्यमांतून असे प्रकार घडत होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या काही अल्पसंख्यांक कृष्णवर्णीयांनी म्हटलं आहे की, अखेर आता तरी ही जोडी वर्णभेदी टीकेतून सुटेल. साना एडनेसने म्हटलं की, देवाचे आभार कारण ते आता स्वतंत्र झाले. त्वचेच्या रंगामुळे कोणीही अपमानास्पद वागणूक सहन करू नये. मला हे माहिती आहे कारण मी कॅरेबियन आहे. इथं लहानाची मोठी झाले आणि याचा अनुभवही घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

“After many months of reflection and internal discussions, we have chosen to make a transition this year in starting to carve out a progressive new role within this institution. We intend to step back as ‘senior’ members of the Royal Family and work to become financially independent, while continuing to fully support Her Majesty The Queen. It is with your encouragement, particularly over the last few years, that we feel prepared to make this adjustment. We now plan to balance our time between the United Kingdom and North America, continuing to honour our duty to The Queen, the Commonwealth, and our patronages. This geographic balance will enable us to raise our son with an appreciation for the royal tradition into which he was born, while also providing our family with the space to focus on the next chapter, including the launch of our new charitable entity. We look forward to sharing the full details of this exciting next step in due course, as we continue to collaborate with Her Majesty The Queen, The Prince of Wales, The Duke of Cambridge and all relevant parties. Until then, please accept our deepest thanks for your continued support.” - The Duke and Duchess of Sussex For more information, please visit sussexroyal.com (link in bio) Image © PA

A post shared by The Duke and Duchess of Sussex (@sussexroyal) on

दुसरीकडे डेलीमेलने शाही राजघराणं सोडण्याच्या या निर्णयावर टीका केली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना स्वार्थी आणि पळपुटे म्हटलं आहे. त्यांच्यासाठी लालची, गर्विष्ठ असे शब्दही वापरण्यात आले आहेत. यावर उत्तर देताना कृष्णवर्णीय कॉमेडियन गिना याशेरेनं म्हटलं की, प्रत्येक कृष्णवर्णीयाला माहिती होतं असं होईल. सातत्याने कठोर टीकेच्या आडून ही वंर्णभेदी टीका आहे.

याबाबत राजघराण्याकडून ट्विटरवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याशी चर्चा सुरू आहे. आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो. पण असे निर्णय घेण्यात काही अडचणी आहेत. त्यावर विचार सुरू आहे.

करोडपतीने घेतला ट्विटर फॉलोअर्सना 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 01:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading