News18 Lokmat

दावोसमध्ये आज मोदींचं भाषण! 'या' मुद्द्यांवर करणार भाष्य

जगातल्या अनेक बड्या कंपन्यांचे अध्यक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहे. तसंच, 70 देशांचे अध्यक्षही परिषदेला हजेरी लावणार आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2018 10:02 AM IST

दावोसमध्ये आज मोदींचं भाषण! 'या' मुद्द्यांवर करणार भाष्य

23 जानेवारी : पंतप्रधान मोदी आज दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत भाषण करणार आहेत. भारतात व्यापार करणं कसं सोपं झालं आहे. आणि भ्रष्टाचार, काळा पैसा आणि लालफित कमी करण्यासाठी आम्ही कोणकोणती पाऊलं उचलली. हे मोदी जगाला सांगणार आहेत. यात आपल्या देशाच्या आर्थिक धोरणांवर मोदी प्रकाश टाकणार आहेत.

जगातल्या अनेक बड्या कंपन्यांचे अध्यक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहे. तसंच, 70 देशांचे अध्यक्षही परिषदेला हजेरी लावणार आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

सरकारमधून कुणाची उपस्थिती ?

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

- अरुण जेटली, अर्थमंत्री

Loading...

- सुरेश प्रभू, वाणिज्यमंत्री

- पियूष गोयल, रेल्वेमंत्री

- धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री

- एम. जे. अकबर, परराष्ट्र राज्यमंत्री

- जितेंद्र सिंग, पीएमओ राज्यमंत्री

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

- चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

या बड्या उद्योगपतींची उपस्थिती

- मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स समूह

- एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा समूह

- गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी समूह

- अझीम प्रेमजी, अध्यक्ष, विप्रो

- राहुल बजाज, अध्यक्ष, बजाज समूह

- चंदा कोच्चर, सीईओ, आयसीआयसीआय बँक

- उदय कोटक, कार्यकारी उपाध्यक्ष, कोटक महिंद्रा बँक

- अजय सिंह, अध्यक्ष, स्पाईसजेट एअरलाईन्स

- एकूण 130 भारतीय सीईओ

- जगभरातून एकूण 2000 सीईओ आणि उद्योगपती

या देशांचे अध्यक्ष दावोसला हजेरी लावणार आहेत.

- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

- अँजेला मरकल, चान्सलर, जर्मनी

- इमॅन्युअल मॅक्राँ, अध्यक्ष, फ्रान्स

- थेरीसा मे, पंतप्रधान, ब्रिटन

- जस्टीन त्रुदो, पंतप्रधान, कॅनडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...