ब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट

ब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट

राष्ट्रकूल परिषदेसाठी ब्रिटनमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 डाऊनिंग स्ट्रिट इथं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली.भारताच्या विनंतीवरून ब्रिटन भारत नेतृत्व करत असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचा सदस्या झाला आहे.

  • Share this:

लंडन,ता.18 एप्रिल: राष्ट्रकूल परिषदेसाठी ब्रिटनमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 डाऊनिंग स्ट्रिट इथं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली. यावेळी व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलीय.

भारताच्या विनंतीवरून ब्रिटन भारत नेतृत्व करत असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचा सदस्या झाला आहे. जगासमोर सध्या अनेक प्रश्न उभे असून भारत आणि ब्रिटन एकत्र आले तर अनेक प्रश्नांवर उत्तर सापडू शकतं असं मत थेरेसा मे यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमधल्या सायन्स प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनात विज्ञान आणि संशोधनाचा 5 हजार वर्षांचा इतिसाह मांडण्यात आला आहे. यावेळी प्रिन्स चाल्सही पंतप्रधानांसोबत होते. लंडनमध्ये पोहोचल्यावर लंडनमधल्या भारतीयांनीही पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं.

 

First published: April 18, 2018, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading