• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • US Election 2020 : अमेरिकेच्या निवडणुकीला नवे वळण, ट्रम्प यांनी केला गंभीर आरोप

US Election 2020 : अमेरिकेच्या निवडणुकीला नवे वळण, ट्रम्प यांनी केला गंभीर आरोप

संपूर्ण जगाचे लक्ष्य लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला (US President Election 2020) नवे मिळाले आहे. जो बायडन (joe biden) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामध्ये काँटे की टक्कर सुरू आहे.

 • Share this:
  अमेरिका, 04 नोव्हेंबर : संपूर्ण जगाचे लक्ष्य लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला (US President Election 2020) नवे वळण मिळाले आहे. जो बायडन (joe biden)  आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. पण, हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच निवडणूक जिंकलो आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अमेरिकेतील नागरिकांचा आभार मानले आहे. 'आम्ही निवडणूक जिंकत आलो आहोत, त्यामुळे जल्लोषाची तयारी सुरू केली होती. पण अचानक वातावरण बदलले आहे. टेक्सास, फ्लोरिडामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं विजयी झालो आहोत, पण तिथे मतं मोजली जात नाही असं समोर आले आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. पण, अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरू आहे', असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या आरोपानंतर एका राज्यातील मतमोजणी ही थांबवण्यात आली आहे. तसंच, 'जो बायडन हे निवडणूक हरले आहेत, पण ते पराभव स्वीकारत नाही. त्यामुळेच त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे', असा टोलाही ट्रम्प यांनी लगावला.  'आम्ही ही निवडणूक जिंकणारच आहोत. हळूहळू पुढे सरकत आहोत. पण, चिंता करण्याची गरज नाही. विजय आपलाच होईल', असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. दरम्यान,  रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये  ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. टेक्सासमधील विजयामुळे मतमोजणीतील चित्र पूर्णपणे पालटले आहे.  टेक्सास, साउथ कॅरोलिना आणि ओक्लाहोमामध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 213 जागांवर आघाडी घेतली आहे. तर जो बायडन  220 जागांवर लढत देत आहे. यूएस नेटवर्क्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोमध्ये विजय मिळवला आहे. पण, निकाल जसे जसे हाती येत आहे, तशी अमेरिकेत परिस्थिती आणखी चिंताजनक बनत चालली आहे. ट्रम्प यांच्या निवास्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अलबामा, मिसिसिप्पी, ऑक्लाहोमा आणि टेनेसी या भागांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेर, इलिनॉय, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी रोड आयलँड या भागांमध्ये विजय मिळवला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: