अटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका!

अटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका!

अटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते.

  • Share this:

वॉशिंग्टन,ता.10 मे: अटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. उत्तर कोरियाच्या भेटीवर गेलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो हे स्वत: या तीनही नागरिकांना घेऊन अमेरिकेत येत आहेत. अशी माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिली होती.

त्यानंतर एंड्रयूज एयर फोर्स तळावर स्वत:जावून त्यांनी अमेरिकेच्या तीन नागरिकांचं स्वागत केलं. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते. किम हक-सोंग, टोनी किम आणि किम डोंग-चुल अशी या अमेरिक नागरिकांची नावं आहेत.

उत्तर कोरियाची विविध कामांसाठी गेलेले असताना देशविरोधी कारवाया आणि हेरगिरीच्या आरोपांखाली या सर्वांना अटक करण्यात आली होती. पोम्पियो यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचीही भेट घेतली होती. किम आणि ट्रम्प यांच्या भेटीची तारिख आणि वेळही ठरल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली.

 

First published: May 10, 2018, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading