Home /News /videsh /

Russia-Ukraine War: ''मी देश सोडला...'' युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं पलायन?, समोर आलं सत्य

Russia-Ukraine War: ''मी देश सोडला...'' युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं पलायन?, समोर आलं सत्य

युक्रेनमधील रशियन लष्करी (Russian military) कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) रशियन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कीवमधील लोकांना सतर्क करण्यात आलं आहे.

    कीव, 05 मार्च: युक्रेनमधील रशियन लष्करी (Russian military) कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) रशियन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कीवमधील लोकांना सतर्क करण्यात आलं आहे. असं सांगितलं आहे की, त्यांना त्यांच्या जवळचा निवारा दिसला की ते तिथे जाऊन आसरा घ्यावा. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. टास एजन्सीनुसार सांगण्यात आलं आहे की, ते कीवमध्येच आहे आणि त्यांच्या कार्यालयातून काम करत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी हे सांगितलं आहे. त्यात त्यांनी आपलं कार्यालयही दाखवलं आहे. यामध्ये ते इथेच त्यांच्या ऑफिसमध्ये आहे असं म्हणताना दिसत आहे. आंद्रे बोरिसोविच सुद्धा येथेच आहे. येथून कोणीही पळून गेलेले नाही. यापूर्वी, रशियाच्या ड्यूमाचे स्पीकर व्हचेस्लाव वोलोडिन यांनी सांगितलं होतं की झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेले आहेत. एजन्सीनं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, जर काही तोडगा निघाला तर अमेरिका रशियाशी चर्चेसाठी तयार आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं आहे की, जर रशियानंही असाच विचार केला आणि ते प्रश्न सोडवायचे असतील तर अमेरिकेलाही त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. काही तासांसाठी युद्धविराम घोषित युक्रेनमधून नागरिकांना बाहेर करण्यासाठी रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रशियानं काही तासांचं युद्धविराम घोषित केला आहे. रशियानं युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर केला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता युद्धविराम होणार आहे. जोपर्यंत येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत हल्ले करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांमध्ये दोन वेळा चर्चा झाल्या आहेत. तर तिसऱ्यांदा बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. अनेक लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून सातत्यानं हल्ले होत आहेत. दरम्यान, रशियानं आता युद्धविरामाची भाषा केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांसाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. Breaking: युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, काही तासांसाठी युद्धविराम घोषित रशिया युक्रेनमध्ये24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहेत. 10 दिवसांनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या