Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच प्रचार सुरु करण्याची ट्विटद्वारे माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच प्रचार सुरु करण्याची ट्विटद्वारे माहिती

कोरोनाची लागण झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात होते.

    वॉशिंग्टन, 6 ऑक्टोबर : कोरोनाची लागण Coronavirus झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात होते. यादरम्यान, लवकरच पुन्हा निवडणूकांचा प्रचार सुरु करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन सोमवारी रुग्णालयातून सुट्टी घेणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, डॉ. कॉनले यांनी ट्रम्प यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये कमी आल्यानंतर त्यांना दोन वेळा अतिरिक्त ऑक्सिजन देण्यात आला असल्याचं सांगितलं. व्हाईट हाऊसचे चिकित्सक डॉ. सीन कॉलने यांनी, ट्रम्प यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून ते रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ शकत असल्याचं सांगितलं. ते पूर्णपणे ठिक झाले नसले तरी घरी जाण्यासाठी सुरक्षित असल्याचंही कॉलने यांनी सांगितलं. गेल्या 24 तासापासून ट्रम्प यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. त्यांना आता श्वासासंबंधी कोणताही त्रास नसून, गेल्या 72 तासात त्यांना ताप आला नाही. त्यांना घरी सोडल्यानंतरही 24 तास वैद्यकीय सेवा दिली जाणार असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती ट्रम्प आपल्या अधिकृत निवासस्थानी, व्हाईट हाऊसमध्ये पोहचले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यापूर्वी त्यांनी, मी लवकरच प्रचार सुरु करणार आहे. फेक न्यूज केवळ फेक पोल दाखवतात. मी आज ग्रेट वाल्टर रीड मेडिकल सेंटरमधून सुट्टी घेत आहे. माझी तब्येत चांगली असल्यांचं सांगत त्यांनी कोरोनाला न घाबरण्याचं नागरिकांना सांगितलं आहे. ट्रम्प प्रशासन अनेक चांगली औषधं आणि माहिती विकसित करत असल्याचंही, त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या