...म्हणून 4 महिन्यांत पहिल्यांदाच मास्क घालून बाहेर पडले डोनाल्ड ट्रम्प

...म्हणून 4 महिन्यांत पहिल्यांदाच मास्क घालून बाहेर पडले डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत आतापर्यंत 32 लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तरी ट्रम्प यांनी याआधी कधीच मास्क घातला नव्हता.

  • Share this:

वॉशिंग्टन, 12 जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आतापर्यंत मास्क घालण्यास नकार दिला होता. मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा कहर जगभरात दिसत असताना ट्रम्प यांनी कधीच मास्कचा वापर केला नाही. मात्र शनिवारी (11 जुलै) रोजी पहिल्यांदाच ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी मास्क घालताना दिसले.

अमेरिकेत आतापर्यंत 32 लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सैनिकी रुग्णालयाला भेट देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घातला. 4 महिन्यात प्रथमच आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना ट्रम्प यांनी मान्य केल्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला.

वाचा-घरातले सर्वच पॉझिटिव्ह, उपसरपंचाने दिला अग्नी; PHOTOS पाहून डोळ्यात येईल पाणी

वाचा-राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह ; राज्यपाल झाले क्वारंटाइन

'रुग्णालयात मास्कचा वापर करणारच'

जखमी आणि संक्रमित कोव्हिड-19 सैनिकांची प्रकृती जाणून घेण्यासाठी ट्रम्प यांनी शनिवारी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरला भेट दिली गेले. हे रुग्णालय वॉशिंग्टनमध्ये आहे. ट्रम्प विमानाने तेथे गेले. जेव्हा ट्रम्प व्हाइट हाऊसच्या बाहेर आले, तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितले की जेव्हा तुम्ही खास करून रुग्णालयात असता तेव्हा मास्क वापरलाच पाहिजे. वॉल्टर रीड हॉलवेमध्ये आल्यानंतर ट्रम्प यांनी दौरा सुरू होताच मास्क घातला. हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना त्यांनी मास्क घातला नव्हता. अध्यक्ष ट्रम्प हे कोरोनाचा प्रसार झाल्यापासून सगळ्यात उशिरा मास्कचा वापर करणाऱ्यांपैकी एक आहेत.

वाचा-कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल?

चीनशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेने केले प्रश्न उपस्थित

हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादणे, अमेरिकन पत्रकारांवर बंदी घालणे, उइगर मुस्लिमांवरील चिनी धोरणे आणि तिबेटमधील सुरक्षा उपाय या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. चीनमध्ये प्लेग रोग पसरल्याबद्दल तरूम यांनीही आपला संताप व्यक्त केला आणि म्हटले की चीन प्लेगला पसरण्यापासून रोखू शकला असता परंतु त्यांनी ते थांबवले नाही आणि कोरोनाच्या बाबतीतही तेच घडले आणि तेथूनच त्याचा प्रसार संपूर्ण देशात होऊ दिला. चीनमधील वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोनो विषाणूमुळे अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग 31 लाख लोकांना झाला आहे आणि त्यामुळे 1,30,000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: July 12, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या