गर्भवती महिलेच्या सुपमध्ये निघाला मेलेला उंदीर, हॉटेलने दिली गर्भपात करण्याची ऑफर!

गर्भवती महिलेच्या सुपमध्ये निघाला मेलेला उंदीर, हॉटेलने दिली गर्भपात करण्याची ऑफर!

  • Share this:

चीन, 14 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये पाल आढळल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असालच. आता या पालीची जागा उंदरानेही घेतली आहे. हो चीनच्या बीजिंगमध्ये रेस्टॉरंटमध्ये सुप पिण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेच्या सुपमध्ये मेलेल्या अवस्थेत उंदीर सापडला. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर 'शियाबु शियाबु' नावाचं हे रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्यात आलं. पण यात सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रकरण मिटवण्यासाठी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला चक्क गर्भपातासाठी 3,000 डॉर्लस देतो अशी ऑफर केली.

खरं तर, 6 सप्टेंबर रोजी ही महिला आपल्या पतीसोबत रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यांनी सुप ऑर्डर केलं आणि सुप पिताना महिलेच्या लक्षात आलं की, त्या सुपामध्ये मेलेला उंदीर आहे. यासंबंधी हॉटेल स्टाफला विचारण्यात आलं तर त्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सुरूवात केली आणि तुम्ही बाळाला घेऊन चिंतेत असाल तर आम्ही गर्भपातासाठी 3000 डॉलर देतो अशी ऑफर या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

या सगळ्या गंभीर प्रकारानंतर महिलेने तिच्या पतीसोबत रुग्णालयात धाव घेतली आणि बाळ सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली. दरम्यान, रुग्णालयाचा सर्व खर्च हा रेस्टॉरंकडून करण्यात आला. या प्रकारानंतर या रेस्टॉरंटचा खरा चेहरा समोर आला.

या रेस्टॉरंटमध्ये पूलच्या पाण्याचा वापर होत असल्याची माहिती हेल्थसंबंधी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण शियाबु शियाबु या हॉटेलच्या चीनमध्ये एकूण 759 शाखा आहेत. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवाशी खेळलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दरम्यान, हा सगळा प्रकार महिलेने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याच्यावर लोकांनीही अतिशय आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे अशा सगळ्यातून लोकांच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजले असं म्हणायला हरकत नाही.

 

२ दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडणारा तरुण कसा झाला 3000 कोटींच्या कंपनीचा मालक?

First published: September 14, 2018, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading