गरिबी आणि बेरोजगारीचा फटका, दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी ‘या’ देशात प्राण्यांची अवैध शिकार सुरू

गरिबी आणि बेरोजगारीचा फटका, दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी ‘या’ देशात प्राण्यांची अवैध शिकार सुरू

धक्कादायक रिपोर्ट, पैसे कमवण्यासाठी या देशात दिला जात आहे प्राण्यांचा बळी.

  • Share this:

केप टाऊन, 26 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) सर्वांच्या आयुष्यावर परिणाम झाला असून जगभरातील सर्वच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहे परिणामी त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यातूनच दक्षिण आफ्रिकेत आता लोक जंगली प्राण्यांच्या अवैध शिकारीकडे वळले आहेत. एका अभ्यासातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण संस्थेने (TRAFFIC ट्रॅफिक) हा अहवाल मांडला आहे.

या अहवालानुसार, आफ्रिकेत अवैध शिकार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ७३ जणांच्या मुलाखतीनंतर, हे निष्कर्ष गुरुवारी या अभ्यासगटाने मांडले आहेत. बेरोजगारी आणि उपासमारीमुळे या लोकांना अवैध शिकारीसारखा गुन्हा करावा लागला, अस त्यात म्हटलं आहे. विविध कारणांमुळे आपल्याला गुन्हेगारीकडे वळावं लागलं. अशा स्थितीत उदरनिर्वाहाचं कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यानं शिवाय कुटुंबाचं पोट भरण्याची चिंता, जबाबदारी असल्याने अखेर हा मार्ग पत्करल्याचं एका अटक केलेल्या व्यक्तीने सांगितलं.

वाचा-प्लास्टिक शिल्ड Coronavirus पासून बचावासाठी बिनकामाच्या - संशोधनातून नवीन माहिती

तर आपल्याला लहानपणी शिक्षण मिळाले नाही, मात्र आपल्या पहिल्या मुलाला शाळेत पाठवण्याची आपली तीव्र इच्छा होती. मी बेरोजगार नसतो तर मी असे गुन्हेगारी कृत्य कधीच केले नसते, असे दुसऱ्या आरोपीने सांगितलं. आपल्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले जीवन जगता यावं, हा आपला उद्देश होता असं एकानं सांगितलं. आयुष्य जगण्यासाठी आपण असे कृत्य केलं मात्र, याचा आपल्याला पश्चाताप असल्याचं एकाने या मुलाखतीत सांगितलं आहे.

वाचा-नागरिकांनो सावध राहा! कोरोना विषाणूनंतर आता ब्रुसेलोसीसचं संकट

या गुन्ह्यांमध्ये अवैध शिकार, प्राण्यांच्या अवयवायंची अवैध वाहतूक, साठवणूक आणि विक्री यांचा समावेश आहे. यात गेंड्यांच्या शिकारीची 74 टक्के प्रकरणं आहेत. दक्षिण आफ्रिका अनेक वर्षांपासून गेंड्यांच्या शिंगांसाठी होणाऱ्या अवैध शिकारीच्या संकटाचा सामना करत आहे. आता त्यांना 30 टक्क्यांपेक्षा अधिक बेरोजगारीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ट्रॅफिकच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात आफ्रिकेत कमीत कमी 8200 गेंड्यांची शिंगांसाठी शिकार करण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 7:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading