अमेरिकेत आणि चीनमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता, रशियानेही टाकला डाव

रशियाने सैन्य वाढवल्यामुळे एकाप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. अमेरिका हा रशियाचा पारंपरिक शत्रू आहे.

रशियाने सैन्य वाढवल्यामुळे एकाप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. अमेरिका हा रशियाचा पारंपरिक शत्रू आहे.

  • Share this:
    मॉस्को, 19 सप्टेंबर : अमेरिका आणि चीनमध्ये पेटलेला वाद आणखी चिघळत चालला आहे. याच दरम्यान रशियानेही आपल्या सैनिकांचा फौज फाटा हा सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रूशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी स्पष्ट केले की, 'दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे रशियाच्या हद्दीत तणावही वाढला आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व चीन सागराक स्थित रशियाचे नौदल बेसवर  व्लादिवोस्तोकवर सैनिकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याच बेसवरून प्रशांत महासागर, पूर्वी चीन सागर आणि फिलिपाईन्स खाडी क्षेत्रात नजर ठेवता येईल.' विशेष म्हणजे, रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी आवर्जून अमेरिका आणि चीन वादाचा उल्लेख टाळला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन वादाचे संकेत दिले आहे. तर राजकीय विश्लेषकाच्या मते, चीनच्या हद्दीपासून आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रात अलीकडे तणाव वाढला आहे. त्यामुळे रशिया चिंतीत आहे. रशियाने आपल्या हद्दीच्या सुरक्षेसाठी जास्त प्रमाणात सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.   रशियाने घेतली सावध भूमिका पण... मॉस्कोच्या कार्नेगी सेंटरचे विश्लेषक अलेक्झेंडर गब्यूव यांनी या वादावर अंदाज वर्तवला आहे. रशियाने सैन्य हे कोणत्याही कारणामुळे वाढवले नाही. कारण, येणाऱ्या काही काळात अमेरिका आणि चीनचे नौदल आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आपल्याच हद्दी जवळ दोन राष्ट्रातील वाद रशिया सहज हाताळणार नाही. त्यामुळे रशियाने दबाव वाढवण्यासाठी आताच तिन्ही दलाच्या सैन्याची कुमक तिथे पाठवली आहे. रशिया अमेरिका आणि चीन दाखवणार आपली ताकद रशियाने सैन्य वाढवल्यामुळे एकाप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. अमेरिका हा रशियाचा पारंपरिक शत्रू आहे. तर दुसरीकडे व्लादिवोस्तोक शहर हे चीनच्या रडारवर असून त्याबद्दल चीन सरकारने दावे करत आहे.  अमेरिका या भागात जपानच्या मदतीने आपले सैन्य उतरवू शकते. त्यांच्या युद्धनौका  साउथ चाइना सी आणि ईस्ट चाइना सी या भागात चक्करा मारत आहे. त्यामुळे चीन आणि रशिया आता आणखी सतर्क झाले आहे. विरोधकांना शिकवणार पुतिन धडा रशियाच्या पूर्व भागात गेल्या अनेक काळापासून  राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली होती. चीनच्या सीमेजवळील खाबरोवस्क शहर या निदर्शनाचे केंद्र बिंदू बनले आहे. या शहरात एका स्थानिक राजकीय नेत्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवस पुतीन यांच्याविरोधात निदर्शनं सुरू होती. अशात पुतीन हे आपल्या विरोधकांना या निमित्ताने धडा शिकवण्याच्या तयारीत आहे.
    Published by:sachin Salve
    First published: