Home /News /videsh /

Pornhub ने केले कडक नियम; आता VIDEO करता येणार नाहीत डाउनलोड

Pornhub ने केले कडक नियम; आता VIDEO करता येणार नाहीत डाउनलोड

फक्त प्रौढांसाठीचे व्हिडिओ असणआऱ्या ‘पॉर्नहब’वरचे (Pornhub) व्हिडिओ आता डाउनलोड करता येणार नाहीत. कंटेण्टवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

    न्यूयॉर्क, 9 डिसेंबर : फक्त प्रौढांसाठीचे व्हिडिओ (Adult Video) प्रसारित करणाऱ्या पॉर्नहब (Pornhub) या वेबसाइटने अधिक कडक नियमावली लागू केली असल्याचं जाहीर केलं आहे. आता ‘पॉर्नहब’वरून पॉर्न व्हिडिओ (Porn Video) डाउनलोड करता येणार नाहीत, तसंच केवळ सदस्य आणि कंटेंट पार्टनर्सनाच तिथे व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत. नियमित वापरकर्त्यांसाठी पडताळणी (Verification) प्रक्रिया राबवली जाणार असून, अपलोड होणाऱ्या व्हिडिओ कंटेंटवर बारकाईने नजर ठेवली (Moderation) जाणार आहे. ‘पॉर्नहब’च्या अज्ञात वापरकर्त्यांकडून अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये जबरदस्ती केलेल्या म्हणजेच लैंगिक अत्याचाराच्या (Non consensual Videos) व्हिडिओजचा समावेश असतो, तसंच त्या व्हिडिओमध्ये अनेकदा अल्पवयीन मुलीही (Underage Girls) असतात. अशा आशयाचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्समध्ये (New York Times) निकोलस क्रिस्तोफ यांनी अलीकडेच दिलं होतं. अशा व्हिडिओबद्दल तक्रारी केल्या, तरी ते डाउनलोड करता येत असल्यामुळे सगळीकडे व्हायरलही होतात, असं त्या वृत्तात म्हटलं होतं. या वृत्तानंतर ‘पॉर्नहब’ला आपलं कामाचं मॉडेल बदलणं भाग पडलं असून, आता तिथे अज्ञात वापरकर्त्यांकडून (Users), तसंच नियमबाह्य व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत. माइंडगीक (MindGeek) या कंपनीकडे पॉर्नहबची मालकी आहे. या कंपनीसोबत असलेले करार पुन्हा तपासून पाहू, असं मास्टरकार्ड (MasterCard) आणि व्हिसा (Visa) या कंपन्यांनी अलीकडेच म्हटलं होतं. त्याचीही पार्श्वभूमी ‘पॉर्नहब’च्या या निर्णयामागे आहे. पॉर्नहबने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात असं म्हटलं आहे – ‘आमच्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आज कठोर पावलं उचलत आहोत. ठरवलेल्या योग्य पद्धतीने ओळख स्पष्ट आणि सिद्ध केलेल्या वापरकर्त्यांनाच (Veriified Users) यापुढे व्हिडिओ कंटेंट अपलोड करण्याची परवानगी दिली जाईल. तसंच आम्ही व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा बंद केली आहे. आमच्या नियंत्रण प्रक्रियेत आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी वाढवल्या असून, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या अनेक संस्थांसह आम्ही अलीकडेच ‘ट्रस्टेड फ्लॅगर प्रोग्राम’ सुरू केला आहे. हरवलेल्या आणि शोषण केल्या जाणाऱ्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय संस्थेसोबत आम्ही याच वर्षी करार केला असून, पुढच्या वर्षी आमचा पहिला ‘ट्रान्स्परन्सी रिपोर्ट’ (Transparancy Report) जाहीर केला जाईल.’ ‘पॉर्नहब’च्या 2021मध्ये जाहीर होणार असलेल्या ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि ट्विटरप्रमाणेच (Twitter) ‘पॉर्नहब’वर काय असावे आणि काय नसावे, याबद्दल आम्ही पारदर्शक भूमिका घेणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या पॉर्नहबचा व्हेरिफाइड युझर (ओळख पटविलेला वापरकर्ता) बनण्यासाठी संबंधिताला आपले युझरनेम कागदावर लिहून तो कागद हातात घेऊन स्वतःचा फोटो पाठवावा लागतो. फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केला जाणार असल्याचे पॉर्नहबने म्हटले आहे. त्यामुळे पॉर्नहबवरून आधी हटवण्यात आलेले व्हिडिओ पुन्हा अपलोड होणार नाहीत. तसेच ‘व्हेरिफाइड मॉडेल प्रोग्राम’मधली सशुल्क डाउनलोड्स वगळता अन्य व्हिडिओ डाउनलोड करण्यावरही बंदी असेल. व्हिडिओ कंटेंटवर आणखी नियंत्रणासाठी ‘रेड टीम’ही तैनात असेल. नियमभंग करून अपलोड केलेले व्हिडिओ हटवण्याचं, तसंच नियंत्रण प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याचं काम ही टीम करील. ‘पॉर्नहब’वर बंदी घातलेल्या ‘कीवर्डस्’ची यादी आधीच खूप विस्तृत आहे. ती यादी अधिक व्यापक करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असं ‘पॉर्नहब’कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘पॉर्नहब बंद करावं आणि मानवी तस्करीसाठी त्यांना जबाबदार धरावं,’ या मागणीसाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सध्या सुरू असून, त्यावर आतापर्यंत 21,56,984 जणांनी स्वाक्षरी केली आहे. पॉर्नहबचे हे बदल फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपासून प्रेरणा घेऊन होत असल्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर 2020 या कालावधीत फेसबुकने बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित माहितीचे 12.4 दशलक्ष पोस्ट्स हटवल्या आहेत. त्याच कालावधीत इन्स्टाग्रामने 10 लाख पोस्ट्स हटवल्या आहेत. तसेच ट्विटरने जुलै ते डिसेंबर 2019 या कालावधीत 2,64,652 अकाउंट्स याच कारणासाठी हटवली आहेत.
    First published:

    पुढील बातम्या