निर्वासितांची वणवण थांबली पाहिजे- पोप फ्रान्सिस

पूर्वीचे नायक वेगळे होते, ते जनतेच्या कल्याणाकडे लक्ष द्यायचे. पण आजचे नायक तसे नाहीत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 01:05 PM IST

निर्वासितांची वणवण थांबली पाहिजे- पोप फ्रान्सिस

 25  डिसेंबर:  निर्वासितांची वणवण थांबायला हवी असं मत व्यक्त केलं आहे कॅथॉलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांनी. ते  ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला  व्हॅटिकनला संबोधित करत होते.

व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमसचा उत्साह वेगळाच असतो. ख्रिस्ती धर्माच्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक असल्यामुळे  व्हॅटिकनमधल्या सेलिब्रेशनला धार्मिक किनार असते.  व्हॅटिकनच्या उत्सवात पोप ही सहभागी होत असल्यामुळे  इथल्या ख्रिसमसला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

पोप फ्रान्सिस यांनी काल संध्याकाळी  सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये जाऊन विशेष प्रार्थनेत सहभाग घेतला. या प्रसंगी पोप काय म्हणतात  याकडे अवघ्या जगाचं लक्ष असतं. ते अनेक वैश्विक विषयांवर भाष्य करत असतात.  सध्या निर्वासितांचा प्रशन मोठा प्रश्न होऊन बसला आहे. त्या निर्वासितांप्रती पोप यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. यावर्षी पोप यांनी निर्वासितांच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

पूर्वीचे नायक वेगळे होते, ते जनतेच्या कल्याणाकडे लक्ष द्यायचे.  पण आजचे नायक तसे नाहीत. आपली ताकद आणि संपत्ती वाढवण्यासाठी ते निष्पापांचं रक्त सांडतात.  त्यांच्यामुळे लाखो लोक निर्वासित होतात.  मैलोंमैल त्यांना चालत जावं लागतं. हे सगळं थांबलं पाहिजे असं पोप फ्रान्सिस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...