अरे बाप रे! पोप फ्रॅन्सिसनी पुन्हा लाईक केला मॉडेलचा सेक्सी फोटो, नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा

कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वांत मोठे धर्मगुरू असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी इन्स्टाग्राम या फोटो-व्हिडीओ शेअरिंग वेबसाईटवर पुन्हा एकदा एका मॉडेलचा सेक्सी फोटो लाईक केला आहे. पोप यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो लाइक झाल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वांत मोठे धर्मगुरू असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी इन्स्टाग्राम या फोटो-व्हिडीओ शेअरिंग वेबसाईटवर पुन्हा एकदा एका मॉडेलचा सेक्सी फोटो लाईक केला आहे. पोप यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो लाइक झाल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 डिसेंबर : रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्याबद्दलचे वाद थांबण्याचं नाव घेत नाही. कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वांत मोठे धर्मगुरू असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी इन्स्टाग्राम या फोटो-व्हिडीओ शेअरिंग वेबसाईटवर पुन्हा एकदा एका मॉडेलचा सेक्सी फोटो लाईक केला आहे. पोप यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो लाइक झाल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. पोप हे 84 वर्षांचे आहेत आणि सर्वोच्च धर्मगुरू आहेत. अशी घटना पुन्हा एकदा घडल्यामुळे वाद वाढला आहे. मारगॉट (Margot) या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट असलेल्या एका बिकिनी मॉडेलने 23 डिसेंबरला तिच्या ट्विटर अकाउंटवर एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यासोबत लिहिलंय,‘uhhh the pope liked my picture?’ या मॉडेलने काळ्या रंगाची बिकिनी घातलेला तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तो फ्रान्सिस यांनी लाईक केला असल्याचं स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

  (वाचा - VIDEO प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला TV,पाहा नेमकं काय झालं)

  एक महिन्यापूर्वी ब्राझिलमधल्या एका मॉडेल नतालिया गॅरिबोट्टोचा (Natalia Garibotto) हॉट फोटो पोप फ्रान्सिस यांनी इन्स्टाग्रामवर लाईक केला होता. तेव्हा या विषयी खूप चर्चा झाली होती. कॅथलिक न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तांनुसार, व्हॅटिकनने हा प्रकार कसा घडला याबद्दल फेसबुकच्या मालकीचं असलेल्या इन्स्टाग्रामकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. द कॅथोलिक चर्चने या संदर्भात अंतर्गत चौकशीही सुरू केली होती. घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन्न गॅरिबोट्टोनी पोप यांच्याकडून तिचा फोटो लाईक केला जाण्याचा प्रकार अनेकांपर्यंत पोहोचला होता. त्या वेळी मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ‘माझे फोटो कदाचित माझ्या आईला आवडत नसतील, पण पोप मात्र त्याचा आनंद लुटतात.’असं ती म्हणाली होती. त्यावेळी द गार्डियनला दिलेल्या प्रसिद्धपत्रकात व्हॅटिकननी म्हटलं होतं की, पोप यांनी असे फोटो लाइक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळेच आम्ही इन्स्टाग्रामकडून याबद्दलचं स्पष्टीकरण मागवलं आहे. आणि आता पुन्हा एकदा तसंच घडलं आहे. पोप फ्रान्सिस हे सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर ही संख्या 18.8 मिलियन आहे. जगातील सर्वांत प्रसिद्ध नेता म्हणून त्यांचा 2017 मध्ये गौरव करण्यात आला होता. त्यामुळेच एवढ्या मोठ्या धार्मिक नेत्याने असं ओंगळवाणं वागणं हे षड्यंत्र आहे का? हे तपासातच सिद्ध होईल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: