'कोरोना'ग्रस्तांसाठी प्रार्थना करणाऱ्या पोप फ्रान्सिस यांना व्हायरसची लागण? Video पाहिल्यानंतर उडाली खळबळ

'कोरोना'ग्रस्तांसाठी प्रार्थना करणाऱ्या पोप फ्रान्सिस यांना व्हायरसची लागण? Video पाहिल्यानंतर उडाली खळबळ

Ash Wednesday Mass दरम्यान पोप फ्रान्सिक (Pope Francis) खोकताना दिसले, त्यांच्या नाकातूनही पाणी वाहत होतं.

  • Share this:

वेटिकन सिटी - चीनी कोरोनाव्हायसरने (Coronavirus) इटलीतही (Italy) थैमान घातलं आहे. रॉयटर्सने (Reuters) दिलेल्या माहितीनुसार इटलीत 400 पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे, तर 12 जणांचा मृत्यू झाला. पोप फ्रान्सिस  (Pope Francis) यांनी कोरोनाग्रस्तांसाठी प्रार्थना केली आहे. मात्र पोप फ्रान्सिस यांनाही व्हायरसची लागण झाली की काय असा प्रश्न आता निर्माण होतो आहे, त्यांच्या एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.

पोप फ्रान्सिस यांचा असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोम चर्चमध्ये Ash Wednesday  Mass दरम्यान ते खोकताना दिसत आहे, त्यांच्या नाकातूनही पाणी वाहत आहे शिवाय त्यांच्या आवाजातही बदल झालेला जाणवतो आहे.

यानंतर गुरुवारी पोप फ्रान्सिस यांनी लोकांच्या संपर्कात जाणं टाळलं आहे. ठरल्यारप्रमाणे त्यांच्या खासगी बैठका होतील, मात्र जास्त लोकांशी संपर्क होईल असे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेत. अशी माहिती वेटिकन (Vatican) प्रशासनाने दिली आहे. पोप फ्रान्सिस यांची ही लक्षणं पाहता त्यांनाही व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र पोप फ्रान्सिस यांना व्हायरसची लागण झाली की नाही याबाबत Vatican प्रशासनाने काहीही माहिती दिलेली नाही.

वेटिकनचे प्रवक्ते मॅटो ब्रुनी यांनी टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार, "पोप फ्रान्सिस यांनी एका चर्चमध्ये रोमन फादर्ससोबत (Roman clergy) मास रद्द केला. त्यांना थोडं बरं वाटत नसल्यानं त्यांनी आपल्या निवासस्थानी Santa Marta मध्ये राहणं पसंत केलं आहे आणि तिथूनच ते इतर कामं करत आहेत"

पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांसाठी प्रार्थना केली. शिवाय रविवारी बारीमध्ये ते अनेक लोकांना भेटले. गर्दीत अनेकांनी त्यांची गळाभेट घेतली, किसिंग केलं. स्वत: मास्क न घालता मास्क न घातलेल्या लोकांना ते भेटले.

पोप फ्रान्सिस यांचे बायोग्राफर Austen Ivereigh यांच्या मते, पोप फ्रान्सिस यांना एक फुफ्फुस नाही. वयाच्या विशीत त्यांचं फुफ्फुस काढून टाकण्यात आलं, जेव्हा त्यांना टीबी झाला होता.

First published: February 28, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading