मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

धक्कादायक! अटक केलेल्या गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच गोळीबार; अधिकाऱ्याची केली हत्या

धक्कादायक! अटक केलेल्या गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच गोळीबार; अधिकाऱ्याची केली हत्या

 पोलीस ठाण्यात बेड्या घालून आणल्यानंतर गुन्हेगाराने तिथेच गोळीबार केला आणि पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच ऑफिसमध्ये हत्या केली.

पोलीस ठाण्यात बेड्या घालून आणल्यानंतर गुन्हेगाराने तिथेच गोळीबार केला आणि पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच ऑफिसमध्ये हत्या केली.

पोलीस ठाण्यात बेड्या घालून आणल्यानंतर गुन्हेगाराने तिथेच गोळीबार केला आणि पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच ऑफिसमध्ये हत्या केली.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

लंडन, 26 सप्टेंबर : पोलीस ठाण्यात बेड्या घालून आणल्यानंतर गुन्हेगाराने तिथेच गोळीबार केला आणि पोलीस अधिकाऱ्याची त्याच्याच ऑफिसमध्ये हत्या केली. ही धक्कादायक घटना ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये घडली आहे. गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याला मारल्यानंतर स्वतःवरसुद्धा गोळी झाडून घेतली.

अवैध शस्त्रास्त्र, दारूगोळा आणि ड्रग्ज बाळगल्याच्या संशयावरून या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.  अज्ञात गुन्हेगाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण हा दहशतवादाचा प्रकार असल्याचं लंडनच्या पोलीस मुख्यालयाने नाकारलं आहे.

इंग्लंडची राजधानी  लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने या अधिकाऱ्याची हत्या केली आहे. या व्यक्तीला अटक केली जात असताना या व्यक्तीने अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर या जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. या हल्लेखोरानी या अधिकाऱ्याला गोळी मारल्यानंतर स्वतःला देखील गोळी मारून घेतली.  23 वर्षीय जखमी हल्लेखोरालादेखील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लंडनचे प्रमुख पोलीस अधिकारी क्रेसिडा डिक यांनी ही घटना धक्कादायक असून याचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितलं की, हल्लेखोर आरोपीला ड्रग आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेत होते. त्यावेळी त्याची मेटल डिटेक्शन चाचणी करण्यात येत असतानाच त्यानी पोलिसांवर गोळीबार केला.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. याविषयी ते म्हणाले, 'मृत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने या घटनेत आपला गमावला आहे. ब्रिटनमध्ये पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या होणं गंभीर आणि दुर्मिळ घटना आहे. आमच्या सुरक्षिततेसाठी प्राण देणाऱ्या या शूर पोलीस अधिकाऱ्याचं ऋण आमच्यावर कायम राहील.  आरोपीनी या अधिकाऱ्यावर गोळीबार केला असता उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली नाही.सामान्यपणे इंग्लंडमध्ये पोलीस बंदूकजवळ बाळगत नाहीत. अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तपास करत असतानाच पोलीस जवळ बंदूक बाळगतात. ब्रिटनमधील पोलीस यंत्रणा पक्की आहे. सामाजिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीनीही थेट पोलिसांवर हल्ला केल्याची उदाहरणं खूपच कमी असून, क्वचितच असा प्रकार तिथे घडतो. हल्लेखोरालाही रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तो बरा झाल्यावर त्यानी हा हल्ला का केला ते कळू शकेल.

First published:

Tags: London