• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बांग्लादेश: दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवलं, मग केले हिंदूंवर हल्ले; CCTV तून उलगडलं सत्य

बांग्लादेश: दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवलं, मग केले हिंदूंवर हल्ले; CCTV तून उलगडलं सत्य

बांग्लादेशात दूर्गापूजेच्या मंडपात लपूनछपून जात कुराण ठेवणाऱ्या माणसाचा शोध लागला (Police found a muslim person planted Quran inside Durga Pandal in Bangladesh) असून सीसीटीव्ही फूटेजमधून ही माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  ढाका, 21 ऑक्टोबर:  बांग्लादेशात दूर्गापूजेच्या मंडपात लपूनछपून जात कुराण ठेवणाऱ्या माणसाचा शोध लागला (Police found a muslim person planted Quran inside Durga Pandal in Bangladesh) असून सीसीटीव्ही फूटेजमधून ही माहिती समोर आली आहे. बांग्लादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये (Hindu Muslim conflict in Bangladesh) संघर्ष सुरू आहे. दूर्गापूजेच्या मंडपात कुराणाची प्रत नेऊन ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला असून इकबाल हुसैन नावाच्या व्यक्तीनं हे कृत्य केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याच कारणामुळे उफाळला होता संघर्ष नवरात्रौत्सवादरम्यान एका दूर्गापूजेच्या मंडपात कुराणाची प्रत आढळल्यानंतर हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील संघर्षाला तोंड फुटलं होतं. या संघर्षात अनेक हिंदूंवर हल्ले करण्यात आले, अनेकांची घरंही जाळण्यात आली. आतापर्यंत या संघर्षात 7 जणांचा बळी गेला आहे. हे सगळं ज्या कारणामुळे घडलं, त्याचा उलगडा आता झाला आहे. कुठल्याही हिंदू व्यक्तीने कुराणाचा अवमान केला नसून इकबाल हुसैन नावाच्या माथेफिरूनेच कुराणाची प्रत मंडपात नेऊन ठेवल्याचं दिसून आलं आहे. इकबान हुसैन ड्रग ऍडिक्ट इकबाल हुसैन हा एक बेरोजगार तरूण असून त्याला अंमली पदार्थांचं व्यसन लागल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. इकबालचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून कुटुंबीयांना तो सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देणारा आणि गुन्हेगारी मनोवृत्तीचा विकृत तरूण असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा- यक्स! उडत्या विमानातून झाला मलमूत्राचा वर्षाव; विमानतळाजवळ अजब घटना पोलीस कारवाई सुरू या दंग्यांप्रकरणी आतापर्यंत 4 प्रकरणं दाखल झाली असून चौकशीसाठी वेगवेगळ्या 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यातील 4 जण इकबालशी संबंधित असल्याचं सिद्ध झालं आहे. इकबाल सध्या फरार असून तो वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्याची माहिती बांग्लादेशचे गृहमंत्री असादुज्जमान खान यांनी दिली आहे. या हिंसाचारानंतर अटकेचं सत्र सुरू झालं असून लवकरच इकबालला अटक केली जाईल, असा विश्वास बांग्लादेशच्या गृहमंत्रालयानं व्यक्त केला आहे.
  Published by:desk news
  First published: