POK मध्ये रॅलीवर पाकिस्तानकडून गोळीबार, दोघांचा मृत्यू तर 80 जण जखमी!

POK मध्ये रॅलीवर पाकिस्तानकडून गोळीबार, दोघांचा मृत्यू तर 80 जण जखमी!

जगभर भारताकडून काश्मिरी लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जात असल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्ताना बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे.

  • Share this:

मुझफ्फराबाद, 23 ऑक्टोबर: जगभर भारताकडून काश्मिरी लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जात असल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. भारतावर आरोप करणारे पाकिस्तान स्वत:POKमधील नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे.पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पाक व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद (Muzaffarabad)येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आणि नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली ही मारहाण इतकी तीव्र होती की यात दोघांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून POKमधील नागरिक आणि राजकीय पक्षांकडून पाक विरोधात आंदोलन सुरु आहे. मंगळवारी POKमधील स्वतंत्र राजकीय पक्षांची संघटना ऑल इंडिपेंडेंट पार्टीज अलायन्स (AIPA) आयोजित करण्यात आली होती. या रॅलीची मुख्य मागणी POKमधील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होती.

पाकिस्तानच्या लष्कराने 22 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मीरमधील काही भागात घुसखोरी करून त्यावर ताबा मिळवला होता. या घटनेच्या 72 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने POKमधील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. येथील राजकीय पक्षांनी हा काळा दिवस असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय पक्षांच्या संघटनांनी मुझफ्फराबाद येथे रॅली काढली होती. या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर येथील प्रेस क्लबवर देखील छापा टाकला. यात अनेक पत्रकार देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी मुद्दाम मारहाण केल्य़ाचा आरोप काही पत्रकारांनी केला आहे. पत्रकारांचे कॅमेरे आणि अन्य साहित्य पोलिसांनी तोडल्याचे एका सांगितले.

पोलिसांनी प्रथम रॅलीवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जम्मू्-काश्मीर पीपल्स नॅशनल अलायन्सची पत्रकार परिषद सुरु असताना तेथे छापा टाकला. मुझफ्फराबाद येथे एका दिवसात झालेली ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. JKPNAने गुरुवारी लंडने येथील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याची धमकी दिली आहे.

मारहाणीचा व्हिडिओ

पोलिसांनी मुझफ्फराबाद येथे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की पोलीस रॅलीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्यावर गोळीबार करत आहेत. मंगळवारीच मुझफ्फराबाद येथेल गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांनी पाकिस्तान सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही

सोमवारी रात्री POKमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 08:38 AM IST

ताज्या बातम्या