• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भर लग्नातून नवरदेवाला अटक, पोलिसांच्या गाडीमागे धावत राहिली वधू

भर लग्नातून नवरदेवाला अटक, पोलिसांच्या गाडीमागे धावत राहिली वधू

लग्नाचे विधी सुरु (Police arrested a groom and bride chased police vehicle) असताना नवरदेवाला पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  इक्वेडोर, 24 नोव्हेंबर: लग्नाचे विधी सुरु (Police arrested a groom and bride chased police vehicle) असताना नवरदेवाला पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाची सर्व तयारी झाली होती, वऱ्हाडी मंडळी जमली होती, थोड्याच वेळात लग्न संपन्न होणार होतं. मात्र तेवढ्यात लग्नाच्या हॉलमध्ये पोलिसांची एन्ट्री झाली आणि (Police entry to arrest groom) सर्वांनाच धक्का बसला. लग्नाचे विधी सुरु असतानाच पोलिसांनी थेट नवरदेवाच्या दिशेनं धाव घेतली आणि त्याला अटक केली. काय आहे प्रकरण? इक्वेडोरमध्ये घडलेल्या या प्रसंगाची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या या नवरदेवाला पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी अटक केली. या नवरदेवाचं हे दुसरं लग्न होतं. त्याचं याअगोदर पहिलं लग्न झालं होतं आणि घटस्फोटही झाला होता. पहिल्या पत्नीला पोटगी देण्याचे आदेश त्याला न्यायालयानं दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशांचं पालन न करता त्याने पहिल्या पत्नीला पोटगी द्यायला नकार दिला होता. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठीही तो खर्च करत नसल्याचं दिसून आलं होतं. त्याच्याविरुद्ध पहिल्या पत्नीनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नववधूला बसला धक्का आपल्या पतीच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती नसणाऱ्या नववधूला मोठा धक्का बसला. आपल्या होणाऱ्या पतीला पोलीस अटक करून नेत असल्याचं पाहून ती पोलिसांना विनंती करू लागली. आपला भावी पती निर्दोष असून त्याला अटक न करण्याची विनवणी करू लागली. मात्र पोलिसांनी त्याला आपल्या वाहनात बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. नववधू पोलिसांच्या गाडीमागून धावू लागली आणि आपल्या पतीची सुटका करण्याची विनंती करू लागली. हा प्रसंग अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हे वाचा- महिलेनं ऑफिसला लावला 7 कोटींचा चुना, कारण ऐकून मालकालाही धक्का वेगवेगळ्या प्रतिक्रिया या घटनेवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलिसांनी किमान लग्न तरी होऊ द्यायला हवं होतं, असं मत एकानं मांडलं आहे. तर पहिल्या पत्नीला पोटगी न देता दुसरं लग्न करणाऱ्या पतीला चांगलीच अद्दल घडायला हवी, असं दुसऱ्यानं म्हटलं आहे.
  Published by:desk news
  First published: