Home /News /videsh /

पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सेक्स वर्कर तरुणीला घेरलं; धक्कादायक वागणुकीचा VIDEO Viral

पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सेक्स वर्कर तरुणीला घेरलं; धक्कादायक वागणुकीचा VIDEO Viral

तरुणी व्हिडीओमध्ये ढसाढसा रडत असल्याचंही दिसत आहे.

    सुडान, 23 सप्टेंबर : आफ्रिकी देश सुडानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Shocking Video Viral on Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओ काही पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी एका महिले सेक्स वर्करसह गैरवर्तणूक करीत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी रडतानाही दिसत आहे. (A video of the African country Sudan on social media) हा व्हिडीओ जुबा सिटी कौन्सिगच्या महापौरांनी फेसबुकवर शेअर केला आहे. सुडानमध्ये सेक्स वर्क बेकायदेशीर आहे. दक्षिण सुडानमध्ये देहविक्रय व्यवसाय चालवणे किंवा त्याचा मालक असणे गुन्हा मानलं जातं. याशिवाय कोणी महिलेला देहविक्रय व्यवसायात ढकलणं आणि यातून आलेल्या उत्पन्नाला गुन्हेगारीच्या श्रेणीत ठेवलं जातं. (Police officers and government officials abuse a female sex worker) हे ही वाचा-16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता पोलीस अधिकारी महिलेला विचारतात की, तू सेक्स सेलर आहेस? तुझ्यामुळे देशाची बदनामी होत आहे. तुला काही इन्फेक्शन तर नाही ना? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी महिलेला अशा प्रकारे वागणूक देऊन तिचा अपमान केला जात असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ साऊथ सुडानच्या अधिकाऱ्यांनी पो,ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्यानुसार, या महिलेशिवाय आणखी 40 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यात अधिकतर महिला आहेत. या महिलांना काळी जादू आणि देह विक्रय व्यवसाय केल्याचा आरोप आहे. यापैकी तीन महिलांची जबरदस्ती एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. याशिवाय इतरांना 400 डॉलर्सचा दंड ठोठावला. किंवा 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सूडानमध्ये बंदी असतानाही देहविक्रय व्यवसाय वाढत असल्याचं दिसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking viral video

    पुढील बातम्या