हे काय भलतं चॅलेंज?, लोकं धावत्या गाडीतून उतरून नाचताय!

हे काय भलतं चॅलेंज?, लोकं धावत्या गाडीतून उतरून नाचताय!

  • Share this:

आशिष राणे, मुंबई, 31 जुलै : आज काल सोशल मीडियावर कोणते चॅलेंज येईल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी मुलांच्या जीवावर बेतणारा ब्लू व्हेल चँलेंज आलं होतं. तसंच काहीस जीवावर बेतणार नवीन एक चँलेंज आलं आहे...या चॅलेंजचं नाव आहे  किकी चॅलेंज....

सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणार हे चॅलेंज आहे किकी चॅलेंज....कॅनेडियन रॅप सिंगर ड्रेकच्या 'इन माय फिलिंग्ज' या व्हिडिओतील 'किकी डु यू लव मी' या गाण्यानं तरुणाईला बेभान करून टाकलं आहे आणि या चॅलेंजला सुरुवात झाली.

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एक व्यक्ती गाडीत बसून गाडी चलवतो आणि दुसरा व्यक्ती चालत्या गाडीखाली उतरतो आणि ड्रेकच्या गाण्यावर नाचायाला लागतो आणि जो व्यक्ती गाडीमध्ये बसलेला असतो ते हा सर्व प्रकार आपल्या मोबईलमध्ये शूट करतो. हे चॅलेंज एवढं फेमस झालं आहे की, लोकं आपल्या जिवावर उदार होऊन हे चॅलेंज पूर्ण करतायत आणि सोशल मीडियावर टाकतायत. एवढंच काय सेलिब्रिटी देखील यापासून वाचू शकले नाही.

पण अश्या जिवावर बेतणाऱ्या किकी चॅलेंजमुळे लोकं स्वतःचा जीव तर धोक्यात घालतायत मात्र रस्त्यावरून चालणाऱ्यांचा देखील जीव धोक्यात घालतायत. हे व्हिडिओ करताना अनेकांचा अपघात देखील झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहे.

त्यामुळे स्वतःचे आणि इतरांचे जिव धोक्यात घालू नाका अन्यथा कारवाई केली जाईल असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट टाकली आहे.

स्वतः सोशल मीडियावर हीट होण्यासाठी आज काल लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या आधी जिवावर बेतणारं ब्लू व्हेल चॅलेंज आणि आता हे किकी चॅलेंज. त्यामुळे तुम्ही हे चॅलेंज स्विकारून स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका...

First published: July 31, 2018, 11:52 PM IST

ताज्या बातम्या